इंडी आघाडीच्या बैठकीत उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना शेवटच्या रांगेत बसवण्यात आल्याने भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेने निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्षाने हा फोटो ट्वीट करत स्वाभिमान शोधून दाखवा, असा टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे भाजपा मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी देखील ट्वीट ठाकरेंवर निशाना साधला आहे.
खरे तर, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये इंडी आघाडीच्या नेत्यांना स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले होते. या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह देशभरातील विविध पक्षांच्या प्रमुखांनी हजेरी लावली होती. यावेळी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने केलेल्या मतचोरीचा पुरावा दाखवत नेत्यांसमोर प्रेझेंटेशन दाखवले. या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंना मागच्या रांगेत बसवल्याचे दिसून आले. त्याचबरोबर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनाही सहाव्या रांगेत स्थान दिल्याचे दिसून आले.
या बैठकीचे फोटो समोर आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून ठाकरेंवर जोरदार टीका केली जात आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरेंवर निशाणा साधत म्हणाले, मला नाही अब्रू, मी कशाला घाबरु. यावर शिवसेनेचे खासदार नरेश मस्के म्हणाले, आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे. शिवरायांचा वारसा सांगता ना, खांग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन शेवटच्या रांगेत बसलात ???? बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान, स्वाभिमान शिकवला अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का ??, असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, आदित्य ठाकरे काँग्रेसने तुमची काय ही अवस्था करून ठेवलीय. तुमच्यापेक्षा एकेक खासदार असणाऱ्या पक्षांना सुद्धा पुढच्या रांगेत बसवले आहे. दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची लाज घालवलीत. थोडा जरी स्वाभिमान आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उ(बा)ठा ना, महाराष्ट्राची किंमत कोणी कुठे वाढवली ते जरा दुसऱ्या फोटोंत बघा, असे खासदार नरेश मस्के म्हणाले.
हे ही वाचा :
कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर पुन्हा गोळीबार!
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या
भारताच्या टी-२० आणि कसोटी संघात श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाची शक्यता
रा.स्व.संघ शताब्दी वर्ष विशेषांक… २०२५ |
भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, भाजपासोबत उध्दव ठाकरे होते तेव्हा मातोश्री व उध्दव ठाकरे यांना किती सन्मान होता. देशातील भाजपाचे अनेक महत्वाचे नेते मातोश्री वर जाऊन सन्मान करीत. २०१९ लोकसभा निवडणूकीच्या वेळी अमित शाह मातोश्रीवर आले होते.
आता पहा, महाविकास आघाडीत आल्या पासून राहूल गांधी, सोनिया गांधी कुणी मातोश्रीवर गेले?. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आंदरांजली वाहण्यास कुणी कॅाग्रेस नेता गेला?. बाळासाहेब ठाकरे यांचा कॅाग्रेसने हिंदुह्दयसम्राट असा उल्लेख केला?, याचे उत्तर केवळ नाही. दरवर्षी आता उध्दव ठाकरेच दिल्लीत राहुल सोनिया गांधींना भेटायला जातात, हिंदुत्व सोडल विचारधारा सोडली त्यातून मान गेला सन्मान गेला हातात पडलं काय तर, बैठकीत अपमानाची थेट शेवटची रांग, असे उपाध्ये म्हणाले.







