25 C
Mumbai
Saturday, January 31, 2026
घरविशेषअर्थमंत्री मांडणार आज देशाचा अर्थसंकल्प

अर्थमंत्री मांडणार आज देशाचा अर्थसंकल्प

टॅक्स स्लॅबमध्ये बदल होणार का? सर्वांचे लक्ष

Google News Follow

Related

आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर होणार असून संपूर्ण देशाचे लक्ष या बजेटकडे लागले आहे. आर्थिक वर्ष २०२६–२७ साठीचा हा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज लोकसभेत मांडणार आहेत. विशेष म्हणजे हे बजेट निर्मला सीतारमण यांचे सलग नववे बजेट ठरणार असून भारतीय अर्थसंकल्पीय इतिहासात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. देशाची आर्थिक दिशा, विकासाची गती आणि सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे अनेक निर्णय या बजेटमधून समोर येण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
अर्थखाते फडणवीसांकडेच! सुनेत्रा पवार पाहणार उत्पादन शुल्क, क्रीडा

इराणमधील बंदर अब्बास पोर्ट येथे जोरदार स्फोट

संतापजनक प्रकार- मालवणीतील नशामुक्ती केंद्रात अल्पवयीन मुलींवर नराधमांचा अत्याचार

‘GaN’ लष्करी तंत्रज्ञानात डीआरडीओचा ब्रेकथ्रू,
यंदाच्या बजेटमध्ये सरकारकडून मध्यमवर्ग, शेतकरी, तरुण आणि उद्योग क्षेत्र यांच्यासाठी मोठ्या घोषणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वाढती महागाई, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि आर्थिक शिस्त राखणे या मुद्द्यांवर सरकारचा भर राहण्याची शक्यता आहे. विशेषतः उत्पन्नकराच्या बाबतीत दिलासा देणारे बदल होणार का, याकडे नोकरदार वर्गाचे लक्ष लागले आहे. कर स्लॅबमध्ये सुधारणा, स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ किंवा कर सवलतींचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बजेटमध्ये रेल्वे, रस्ते, गृहनिर्माण, संरक्षण, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद होऊ शकते. पायाभूत सुविधांवरील खर्च वाढवल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल, असा सरकारचा अंदाज आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी पीक विमा, सिंचन योजना आणि कृषी कर्जाबाबत काही महत्त्वाचे निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. स्टार्टअप्स आणि लघुउद्योगांना चालना देण्यासाठी सवलतींची घोषणा होण्याचीही अपेक्षा आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा