उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील एका दुर्मिळ गरोदरपणाच्या घटनेने डॉक्टरांना धक्का बसला आहे. या भागातील ३० वर्षीय महिलेला सतत पोटदुखीचा त्रास होत होता आणि तिने अखेर वैद्यकीय मदत घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिचा एमआरआय रिपोर्ट पाहून डॉक्टरही थक्क झाले. महिलेच्या गर्भाशयात नाहीतर यकृतात १२ आठवड्यांचा गर्भ वाढत असल्याचे समोर आले.
महिलेच्या यकृताच्या उजव्या भागामध्ये गर्भ आढळून आला, असे तपासणी करणारे रेडिओलॉजिस्ट डॉ. के. के. गुप्ता यांनी सागितले. स्कॅन दरम्यान त्यांना गर्भाच्या हृदयाचे ठोके देखील आढळले. बुलंदशहर येथील रहिवासी असलेली ही महिला गृहिणी आहे आणि आधीच दोन मुलांची आई आहे. तिचा नवरा एका खाजगी कंपनीत नोकरी करतो.
जवळजवळ दोन महिन्यांपासून तिला पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होत होता. अनेक डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि अनेक ठिकाणी उपचार घेऊनही तिला आराम मिळाला नव्हता. अखेर एमआरआय स्कॅनसाठी एका खाजगी इमेजिंग सेंटरमध्ये पाठवल्यानंतरच तिच्या अस्वस्थतेचे खरे कारण उघड झाले.
वैद्यकीय सूत्रांच्या मते, भारतात यापूर्वी कधीही असा कोणताही रुग्ण आढळलेला नाही. २२ जुलै रोजी एमआरआय करणारे डॉ. गुप्ता यांनी असामान्य निदानाची पुष्टी केली. “ही १२ आठवड्यांची गर्भधारणा होती जी गर्भाशयाऐवजी यकृतात होती,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा :
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे आतंकवादाविरोधात कठोर पाऊल
हिंदू तरुणाशी लग्न करणाऱ्या वधूच्या तोंडून निघाले ‘या अल्लाह’
Russia Earthuquake: कुठे आणि कधी आहे त्सुनामीचा खतरा
अल कायदाच्या दहशतवादी मॉड्यूलची मुख्य हस्तक शमा परवीनला बेंगळुरूत अटक
त्यांनी पुढे सांगितले की स्कॅननंतर, त्यांनी या स्थितीचा सखोल अभ्यास केला आणि त्यांना आढळले की ही एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे, आजपर्यंत जगभरात असे फक्त १८ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, अशी गर्भधारणा १४ आठवड्यांपेक्षा जास्त काळ पुढे नेता येत नाही, कारण ती आईच्या आयुष्यासाठी घातक ठरू शकते.
अशा परिस्थितीत, सहसा शस्त्रक्रियेद्वारे गर्भ काढून टाकला जातो. दरम्यान, डॉक्टरांच्या पथकाने महिलेला पुढील उपचारांसाठी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे रेफर केले आहे. आता त्या महिलेवर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.







