बालाकोटनंतर वेगवेगळे धडे; ऑपरेशन सिंदूरमध्ये हवाई शक्तीचा वापर!

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांचे वक्तव्य

बालाकोटनंतर वेगवेगळे धडे; ऑपरेशन सिंदूरमध्ये हवाई शक्तीचा वापर!

संरक्षण दलांचे प्रमुख (CDS) जनरल अनिल चौहान यांनी गोरखपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना भारताच्या अतिरेकविरोधी कारवाईबाबत महत्त्वाचे खुलासे केले. त्यांनी बालाकोट हवाई कारवाई, सर्जिकल स्ट्राईक्स, पुलवामा, पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेले निर्णय आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ याबाबत माहिती दिली.

जनरल अनिल चौहान म्हणाले, ”बालाकोट ऑपरेशननंतर भारत आणि पाकिस्तानने वेगवेगळे धडे घेतले. भारताने लांब पल्ल्याच्या अचूक हल्ल्याच्या शस्त्रांवर आणि हल्ल्यानंतर झालेल्या नुकसानीच्या मूल्यांकनावर लक्ष केंद्रित केले. तर पाकिस्तानने कदाचित आपली हवाई सुरक्षा मजबूत करण्यावर भर दिला.”

२०१६ च्या उरी दहशतवादी हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक दरम्यान, भारतीय सैन्याने जमिनीवरून पाकिस्तानात प्रवेश केला आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पुलवामा हल्ल्यानंतर आम्ही खैबर पख्तूनख्वा प्रदेशात हवाई हल्ले केले. पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर, आमच्याकडे आधीच सुधारित अचूक हल्ल्याची क्षमता होती.

हे ही वाचा : 

कॉंग्रेस आमदार म्हणतो, आदिवासी हिंदू नाहीत!

मुंबईत १.५ लाख घरगुती अन ६५०० सार्वजनिक गणपतींचे विसर्जन, पोलीसही सज्ज

कर्नाटक काँग्रेसने केली शिफारस; इव्हीएम नको, मतपत्रिकांवर घ्या निवडणुका!

बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी सरकार घाबरलंय!

ते पुढे म्हणाले, “बहावलपूर आणि मुरिदके येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी फक्त ड्रोन आणि लोइटरिंग म्युनिशन पुरेसे नव्हते. हवाई शक्तीचा वापर आवश्यक होता. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान राजकीय नेतृत्वाने स्पष्ट निर्देश दिले होते की दहशतवादी तळ नष्ट करायचे आणि आपल्यावर हल्ला झाला तरच प्रत्युत्तर द्यायचे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, आम्हाला टार्गेटचे नियोजन आणि निवड यासह पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य देण्यात आले.”

दरम्यान, जनरल चौहान यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते की, भारताची दहशतवादविरोधी धोरणे आता अधिक आक्रमक, सुस्पष्ट आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम झाली आहेत.

 

Exit mobile version