27 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरविशेषउत्तराखंडमधील पर्यटक आता हवेत उडणार!

उत्तराखंडमधील पर्यटक आता हवेत उडणार!

भारतातील पहिली 'गायरोकॉप्टर सेवा' केली सुरू

Google News Follow

Related

उत्तराखंड टुरिझमने भारतातील पहिली गायरोकॉप्टर सेवा सुरू केली आहे. भारतात पहिल्यांदाच सुरू होत असल्याचा दावा उत्तराखंड राज्याने केला आहे. गायरोकॉप्टरच्या माध्यमातून बहुप्रतिक्षित हिमालय दर्शन लवकरच सुरू होणार असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. शनिवारी हरिद्वारमध्ये त्याची चाचणी सुरू झाली. गायरोकॉप्टरच्या शुभारंभामुळे उत्तराखंडमधील पर्यटनाला चालना मिळणार आहे.

१६ डिसेंबर २०२३ रोजी बैरागी कॅम्प, हरिद्वार येथून प्रथम गायरोकॉप्टर चाचणी उड्डाण यशस्वीरीत्या पूर्ण करून राज्याच्या पर्यटनात एक नवीन अध्याय जोडला गेला. याद्वारे पर्यटक हिमालयन एअरसफारी योजनेंतर्गत प्रवासाला जातील. पर्यटक आकाशात उडू शकतील आणि हिमालय पर्वतरांगा, नद्या आणि निसर्गाचा आनंद घेतील.

हे ही वाचा:

ठाकरेंनी अदानींचे विमान वापरले, पैसे नाही भरले!

विघ्नेश मुरकर युवा महोत्सव फोटोग्राफी स्पर्धेत पहिला

मुंबई खिलाडी संघाचे नेतृत्व अनिकेत पोटेकडे

सायबर फसवणूक प्रकरणी सरकारचे कडक धोरण, ५५ लाख सिम केले ब्लॉक!

चाचणी उड्डाणात सहभागी असलेले उत्तराखंड पर्यटन विकास मंडळाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल अश्विनी पुंडीर म्हणाले की, लवकरच राज्यातील विविध पर्यटन स्थळांची हिमालयन एअर सफारी योजना गायरोकॉप्टरच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. या योजनेत पर्यटक गायरोकॉप्टरमध्ये एका ठिकाणाहून उड्डाण करतील, हिमालयातील शिखरे आणि नद्यांच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेतील, दुसर्‍या स्थळी पोहोचतील आणि थोडा वेळ घालवल्यानंतर पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी परततील.

कर्नल पुंडीर म्हणाले की, जर्मनीकडून अत्याधुनिक गायरोकॉप्टर्स खरेदी करण्यात आले असून सुरुवातीला तज्ञ प्रशिक्षित जर्मन वैमानिकांकडून ऑपरेशनचे नेतृत्व केले जाईल. नागरी विमान वाहतूक विभाग आणि जिल्हा प्राधिकरणांच्या सहकार्याने विविध निसर्गरम्य स्थळांवर विशेष हवाई पट्ट्या विकसित करण्याच्या योजना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा