27 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरविशेषसंगीत विश्वातला तारा निखळला; ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

संगीत विश्वातला तारा निखळला; ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Google News Follow

Related

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. त्या किराणा घराण्यातील भारतीय शास्त्रीय गायिका होत्या. त्यांना भारत सरकारने तीनही ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित केले होते. प्रभा अत्रे या ‘स्वरप्रभा’ या कार्यक्रमात गायन करण्यासाठी पुण्याहून मुंबईला जाणार होत्या. मुंबईत त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पहाटे झोपेत असताना प्रभा अत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या आधीच त्यांचे निधन झाले होतं.  प्रभा अत्रे यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्यामुळे ते भारतात आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं होतं. प्रभा अत्रे यांच्या निधनाने संगीत विश्वातला एक तारा निखळला, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

प्रभा अत्रे यांचा जन्म पुण्यात झाला आहे. त्यांचे वडील आबासाहेब तर आई इंदिराबाई अत्रे. लहानपणापासूनच प्रभा यांना संगीताची आवड होती. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी शास्त्रीय गायनाकडे वळल्या. संगीत शिकत असतानाच त्यांनी विज्ञान आणि कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. प्रभा यांनी गुरुशिष्य परंपरेत संगीताचे शिक्षण घेतले. किराणा घराण्यातील सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. गायनासोबतच त्यांनी कथ्थक नृत्याचे सुद्धा प्रशिक्षणही घेतले होते.

हे ही वाचा:

इंडिया गटाच्या बैठकीत ममता बॅनर्जी सहभागी होणार नाहीत

निवृत्त होईपर्यंत आठवड्याला ८० ते ९० तास काम करायचे नारायणमूर्ती

जय श्रीराम: रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बोलावणार हुतात्मा कारसेवकांच्या कुटुंबियांना

स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिवस…विचारांचा जागर

प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक होत्या. गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व होते. भारतीय शास्त्रीय संगीत या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा