28 C
Mumbai
Friday, February 20, 2026
घरविशेषउपराष्ट्रपती निवडणूक: पंतप्रधान मोदींनी केले पहिले मतदान!

उपराष्ट्रपती निवडणूक: पंतप्रधान मोदींनी केले पहिले मतदान!

संध्याकाळी निकाल अपेक्षित 

Google News Follow

Related

मंगळवारी (९ सप्टेंबर) रात्रीपर्यंत भारताला नवा राष्ट्रपती मिळणार आहे. जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यानंतर रिक्त राहिलेल्या पदासाठी संसद सदस्यांकडून आज मतदान सुरु आहे. या स्पर्धेत भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी एनडीएचे उमेदवार, महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि विरोधी इंडिया ब्लॉकचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत आहे. नवीन संसद भवनात सकाळी १० वाजता मतदान सुरू झाले. लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान करू शकतील. मतमोजणी संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल आणि निकाल संध्याकाळी उशिरा अपेक्षित आहेत.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले मतदान केले. ते सकाळी १० वाजण्यापूर्वी संसद भवनात पोहोचले आणि मतदान कक्षाकडे जाताना केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि राम मोहन नायडू त्यांच्यासोबत होते. 

दरम्यान, बिजू जनता दल (BJD), भारत राष्ट्र समिती (BRS) आणि शिरोमणी अकाली दल (SAD) या तीन प्रादेशिक पक्षांनी मतदानात भाग न घेण्याचा निर्णय घेतल्याने, एकूण मतदारसंख्या घटली आहे. सामान्यपणे उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ७८१ खासदारांच्या मंडळातून पार पडते.

यामध्ये लोकसभा (५४२) आणि राज्यसभा (२३८) अशा एकूण ७८० खासदारांचा समावेश होतो (एक नामनिर्दिष्ट सदस्य मतदान करीत नाही). मात्र, सध्या लोकसभेतील एक आणि राज्यसभेतील सहा जागा रिक्त असल्याने एकूण कार्यरत मतदारसंख्या ७७४ इतकी झाली आहे. तसेच, BJD, BRS आणि SAD या पक्षांच्या एकत्रित १२ खासदारांनी मतदानात गैरहजर राहण्याची घोषणा केल्याने, अंतिम मतदारसंख्या आता ७६९ वर आली आहे.

एनडीएकडे सध्या ४२५ खासदारांचे पाठबळ आहे. याशिवाय, वायएसआर काँग्रेसचे ११ खासदार देखील त्यांना समर्थन देत असल्याने, एकूण ४३६ खासदारांचा पाठिंबा एनडीएला मिळतो. विरोधी इंडिया आघाडीकडे सुमारे ३२४ खासदारांचे समर्थन आहे. त्यामुळे आकड्यांच्या तुलनेत एनडीएचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या विजयाची शक्यता जवळपास निश्चित आहे.

हे ही वाचा : 

नेव्ही नगरात खळबळ; अग्निवीर जवानाची रायफल, मॅगझिन, जिवंत राऊंड लंपास

लालबाग विसर्जनात भाविकांना लुटणारी १५ जणांची टोळी गजाआड

भारतातील औद्योगिक वस्तू क्षेत्रात प्रचंड संधी

उपराष्ट्रपती निवडणुकीत बीजेडी आणि बीआरएस भाग घेणार नाहीत!

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
294,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा