गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाण घेताच कोसळले. या विमानात २४२ प्रवासी होते. एअर इंडियाचे विमान लांब पल्ल्याच्या प्रवासाला निघाले होते. त्यामुळे विमानात भरपूर इंधन होते. विमानतळ परिसराजवळ विमानाला अपघात झाला. या विमानाला अपघात कसा झाला याचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये विमानाच्या ढिगाऱ्यातून धूर निघताना दिसत आहे. एअर इंडियानेही विमान अपघाताची माहिती दिली आणि अधिक माहिती गोळा केली जात असल्याचे सांगितले.
अपघातानंतर विमान बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर कोसळले. सिव्हिल हॉस्पिटलजवळ ही दुर्घटना घडली. गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून घटनेची माहिती घेतली. दरम्यान, एनडीआरएफ टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरू केले आहे. अपघातानंतर अहमदाबाद विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आले आहे. अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील असल्याची माहिती समोर येत आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की विमानात २४२ लोक होते, ज्यात २ पायलट आणि १० केबिन क्रू होते. विमानाचे नेतृत्व कॅप्टन सुमित सभरवाल करत होते आणि त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर होते.
हे ही वाचा :
विमान क्रॅश : वेदना शब्दांत व्यक्त करता येणं अशक्य
पायलटने ‘मे-डे’ कॉल केला होता !
भारतातील घडलेले १० भीषण विमान अपघात
आषाढी यात्रेसाठी ५ हजार २०० विशेष बसेस
दरम्यान, अपघातग्रस्त विमान ११ वर्षे जुने होते. ते अमेरिकन कंपनी बोईंगने बनवले आहे. हे विमान अनेक धातूंच्या मिश्रणाने बनवले असल्यामुळे त्याचे वजन खूप कमी असते. आणि याच कारणामुळे हे विमान लांब अंतर प्रवास करण्यास सक्षम असते. यासोबतच या विमानात इंधनाचा वापर कमी होतो. म्हणूनच जगातील प्रत्येक मोठी विमान कंपनी या विमानाचा वापर करते.
Very shocked to hear about the #AirIndia Ahmedabad-London flight incident near Ahmedabad airport. Praying for the safety of all passengers and crew. 🙏#PlaneCrash #Ahmedabad pic.twitter.com/jmKkgJbHeU
— TVK Vijay Trends (@TVKVijayTrends) June 12, 2025







