24 C
Mumbai
Friday, December 12, 2025
घरविशेषमार्कोस कमांडोनी जहाज घेतले ताब्यात; वाचवले भारतीयांचे प्राण!

मार्कोस कमांडोनी जहाज घेतले ताब्यात; वाचवले भारतीयांचे प्राण!

वाचवलेल्यांमध्ये १५ भारतीयांचा समावेश

Google News Follow

Related

भारतीय नौदलाने शौर्याची आणखी एक मशाल सादर केली आहे.शुक्रवारी उत्तर अरबी समुद्रात ‘एमव्ही लीला नॉरफोक’ नामक मालवाहू जहाजाचे समुद्री लुटाऱ्यांनी अपहरण केले होते.अपहरणाची माहिती भारतीय नौदलाला मिळताच नौदलाने मालवाहू जहाजावर ताबा मिळवला आणि समुद्री लुटेरुंच्या तावडीतून २१ जणांची सुटका केली.या लोकांमध्ये १५ भारतीयांचा समावेश होता.जहाजावरील लोकांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर मरीन कमांडो तपास करत आहेत. नौदलाने या संपूर्ण घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. व्हिडिओमध्ये कमांडो जहाजावर जाऊन ऑपरेशन करताना दिसत आहेत.

याबाबत नौदलाचे मार्कोस कमांडो म्हणाले की, जहाजावर पाच ते सहा सशस्त्र लोक असल्याची माहिती मिळाली होती, ज्यांच्याबद्दल कोणतीही माहिती न्हवती.अपहरण झालेले ‘एमव्ही लीला नॉरफोक’ जहाज शोधण्यासाठी एक युद्धनौका, सागरी गस्ती विमान P-८I आणि लांब पल्ल्याचा ‘Predator MQ९B ड्रोन’ तात्काळ तैनात करण्यात आला. आयएनएस चेन्नईने शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता अरबी समुद्रात सोमालियाच्या किनार्‍याजवळ अपहरण केलेल्या जहाजाला घेरण्यात आले.

कमांडोने सांगितले की, सैनिकांनी जहाजाला वेढा घातला आणि समुद्री लुटेरूंना जहाज सोडण्याचा इशारा दिला. त्यानंतर, भारतीय नौदलाचे मार्कोस कमांडो अपहरण केलेल्या जहाजावर उतरले आणि त्यांनी वरच्या डेक, मशिनरी कंपार्टमेंट्स आणि राहण्याच्या खोलीची झडती घेतली.मात्र तेथे कोणतेही समुद्री लुटेरू आढळले नाहीत.

कमांडो म्हणाले की, मोठ्या संख्येने सैनिक पाहिल्यावर समुद्री लुटेरूंनी रात्रीच्या अंधारात तेथून पळ काढल्याचे दिसून आले.सध्या भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस चेन्नई नॉरफोकजवळ एमव्ही लीला या मालवाहू जहाजासह उपस्थित आहे. पुढील बंदरात प्रवास सुरू करण्यासाठी जहाजाला ऊर्जा निर्मिती आणि नेव्हिगेशन सिस्टममध्ये पुनर्संचयित केले जात आहे.भारतीय नौदलाच्या शौर्याचे सर्वजण कौतुक करत आहेत.

हे ही वाचा:

दाऊदच्या स्थावर मालमत्तेची खरेदी केली दिल्लीच्या अभय श्रीवास्तव यांनी

भव्य राम मंदिरातील प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट

जय श्रीराम : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पोटी येऊदे ‘राम

दरम्यान, जहाजाचे मालक लीला ग्लोबलचे मुख्य कार्यकारी स्टीव्ह कुंजर यांनी नौदलाचे आभार मानले आहेत. यासोबतच ते म्हणाले की, जहाजावर उपस्थित असलेल्या क्रूचे देखील कौतुक करायचे आहे कारण की, त्यांनी कठीण परिस्थितीत भान न गमावता जबाबदारीने काम केले.

यूके मेरीटाईम ट्रेड ऑपरेशन्स (यूकेएमटीओ) एजन्सीने सांगितले की, जहाजावरील सर्व भारतीय सुरक्षित आहेत. आयएनएस चेन्नईच्या देखरेखीखाली सोमालियाच्या किनाऱ्यावरून ते बाहेर काढले जात आहे. याआधी गुरुवारी, नौदलाला यूकेएमटीओकडूनच माहिती मिळाली होती की पाच-सहा दरोडेखोर जहाजावर चढले आहेत आणि ते जहाज सोमालियाच्या दिशेने घेऊन जात आहेत. हे मालवाहू जहाज ब्राझीलमधील पोर्ट डो इको येथून बहरीनमधील खलिफा बिन सलमान पोर्टकडे जात होते.परंतु दहा दिवसांपूर्वीच समुद्री लुटेऱ्यांनी हे जहाज अपहरण केले.

दरम्यान, या घटनेनंतर परराष्ट्र मंत्रालयाने देखील चिंता व्यक्त केली.समुद्री लुटेरे पुन्हा सक्रिय होणे संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे.विशेष म्हणजे, २०१७ मध्ये अनेक देशांच्या नौदलाने विशेष मोहीम राबवत समुद्री लुटेरुंचा जवळपास खात्मा केला होता.भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी अरबी समुद्रात भारतीय युद्धनौकांना चाच्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या भागातील व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले टाळण्यासाठी भारतीय नौदलाच्या चार युद्धनौका अरबी समुद्रात तैनात करण्यात आल्या आहेत. नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय नौदल मुख्यालय समुद्रातील आपल्या कामांवर बारीक लक्ष ठेवून आहे.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा