29 C
Mumbai
Thursday, January 1, 2026
घरविशेषविजयपत सिंघानियांची उद्विग्नता; गौतम सिंघानिया रेमंडला उद्ध्वस्त करतोय!

विजयपत सिंघानियांची उद्विग्नता; गौतम सिंघानिया रेमंडला उद्ध्वस्त करतोय!

रेमंड लिमिटेडचा स्टॉक आठ टक्क्यांनी घसरला आहे

Google News Follow

Related

‘रेमंड हे नाव उभे करण्यासाठी खूप वेळ आणि प्रयत्न खर्ची करावे लागले आहेत. मात्र माझा मुलगा हे सारे उद्ध्वस्त करतोय, हे पाहून मला अतीव दुःख होत आहे,’ अशी खंत रेमंडचे माजी अध्यक्ष ८५ वर्षीय विजयपत सिंघानिया यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. तरीही त्यांनी मुलगा गौतम सिंघानिया यांच्या कोणत्याही निर्णयात आपण ढवळाढवळ करणार नसल्याचे स्पष्ट केले.

 

‘तो रेमंड उद्ध्वस्त करतोय. तो मलाही दुखावतोय. पण मी यात ढवळाढवळ करणार नाही. त्याने काय केले पाहिजे, हे मी त्याला सांगणार नाही. त्याने त्याचे आयुष्य जगले पाहिजे, मी माझे जगलो. आता कदाचित माझ्याकडे केवळ तीन ते चार वर्षेच उरली आहेत,’ असे विजयपत सिंघानिया म्हणाले. त्यांनी गौतम आणि त्यांची पत्नी नवाझ मोदी यांच्या विभक्त होण्याबद्दलही टिप्पणी केली.

 

‘जेव्हा तुमचे स्वतःचे कुटुंब अशा प्रसंगांतून जात असते, तेव्हा कोणती तणवाची परिस्थिती असते, याचे वर्णन करणे कठीण असते. मी केवळ देवाकडे प्रार्थना करू शकतो. तो या समस्या दूर करण्यात मदत करेल. माझ्या कुटुंबात असे काही घडेल, याची मी कल्पनाही केली नव्हती,’ अशी प्रतिक्रिया सिंघानिया यांनी दिली. मात्र आता ते यात दखल देणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

गौतम सिंघानिया आणि नवाझ मोदी यांच्या विभक्ततेमुळे १५०० कोटी बाजार भांडवल असणाऱ्या रेमंड लिमिटेडच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. करोनाकाळात वाईट कामगिरी झाल्यानंतर गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांत सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या समभागांपैकी एक असूनही रेमंड लिमिटेडचा स्टॉक आठ टक्क्यांनी घसरला आहे. मार्च २०२०पासून रेमंडच्या शेअरचा भाव आठ पटीने वाढले आहे.

हे ही वाचा:

इस्रायल-हमास चार दिवस युद्धविराम; हमास करेल १३ ओलिसांची सुटका!

‘या’ प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयावर गुन्हा

तेलंगणा विधानसभा निवडणुकीपूर्वी हैदराबादमध्ये कारमधून ५ कोटींची रोकड जप्त!

रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती!

गौतम आणि नवाझ विभक्त झाल्यानंतर ७५ टक्के मालमत्ता पत्नीला द्यावे लागणार असल्याचे वृत्त आल्यानंतर ही घसरण झाली आहे. ‘हिंदू विवाह कायद्यानुसार, पतीची ५० टक्के मालमत्ता विभक्त झाल्यानंतर पत्नीला आपोआपच मिळणार आहे. कोणताही सर्वसाधारण वकील तिला हे मिळवून देऊ शकतो. मग ती ७५ टक्क्यांसाठी का भांडते आहे. गौतम हे कधीच देणार नाही, सर्वकाही आणि सर्वांना विकत घेणे, हेच त्याचे ध्येय आहे,’ अशी टीका त्यांनी केली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा