27 C
Mumbai
Thursday, January 8, 2026
घरविशेषइम्रान खानचे वकील आणि पीएमएल-एन सिनेटर यांच्यात टीव्ही शोमध्ये ठोसेबाजी

इम्रान खानचे वकील आणि पीएमएल-एन सिनेटर यांच्यात टीव्ही शोमध्ये ठोसेबाजी

शिवीगाळ करत दोन्ही नेत्यांमध्ये मारणारी

Google News Follow

Related

पाकिस्तानमधील एका राजकीय टॉक शोमध्ये दोन राजकारण्यांमध्ये वाद निर्माण होत हातापायी झाल्याचे पाहायला मिळाले.जावेद चौधरी यांनी होस्ट केलेल्या “कल तक” या लोकप्रिय पाकिस्तानी टॉक शोमध्ये ही घटना घडली.याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये दोन्ही नेते शिवीगाळ करत एकमेकाला मारताना दिसत आहेत.

 

 

इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) शी संबंधित वकील शेर अफझल मारवत आणि नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) चे सिनेटर अफनान उल्लाह हे दोन राजकारणी या शोमध्ये उपस्थित होते.सिनेटर अफनान उल्लाह खान यांनी पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांच्यावर गैरवर्तणूक आणि लष्करी आस्थापनेशी गुप्त चर्चा केल्याचा आरोप केल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये वादाला सुरुवात झाली.

 

 

अफनान उल्लाह खान यांच्या आरोपावर मारवत यांनी प्रत्युत्तर म्हणून शारिरीक हिंसाचाराचा अवलंब करत खान यांच्या डोक्यावर हाताने मारायला सुरुवात केली.अफनान उल्लाह खान यांनी सुद्धा तशाच प्रकारे प्रत्युत्तर दिल्याने परिस्थिती आणखीनच बिघडली आणि थेट टेलिव्हिजनवर जोरदार हाणामारी झाली.

हे ही वाचा:

१२ वर्षीय बलात्कार पीडितेच्या वडिलांना फोटोवरून पटली ओळख!

कुख्यात गुंड आतिकच्या भावाच्या बेनामी संपत्तीची रहस्ये उलगडली

तरुणाने आत्महत्येचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला हेरले!

कॅनडामध्ये प्रवेश मिळालेले तब्बल छत्तीस हजार विद्यार्थी चिंतेत

शोच्या क्रू आणि होस्टने त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला परंतु दोघांचे भांडण सुरूच राहिले, अचानकपणे झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीवर पोचल्याने शोचे दर्शक आणि देशाला धक्का बसला.या घटनेनंतर दोन्ही राजकारण्यांनी सोशल मीडियावर आपल्या कृतीचा बचाव केला.पीटीआयचे नेते इम्रान खान यांच्या विरोधात अफनान उल्लाह खान यांनी केलेला आरोप आणि अपमानास्पद भाषेचा उल्लेख केल्याने हे सर्व घडल्याचे सांगत मारवत यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले.

 

 

दुसरीकडे, सिनेटर अफनान उल्लाह खान म्हणाले, मी अहिंसेवर विश्वास ठेवतो परंतु नवाझ शरीफ यांचा मी सैनिक असल्याचे सांगत त्यांनी आपल्या कृतीचा बचाव केला.” मारवत यांनी काल टॉक शोमध्ये माझ्यावर हल्ला केला, मी अहिंसेवर विश्वास ठेवतो पण मी नवाझ शरीफ यांचा सैनिक आहे. मारवतवर जी युक्ती लावली गेली आहे, तो सर्व पीटीआयसाठी आणि विशेषत: इम्रान खानसाठी एक महत्त्वाचा धडा आहे, ते करू शकणार नाहीत. आकार पहा, त्यांना मोठा काळा चष्मा घालावा लागेल,” त्याने लिहिले.मात्र, हिंसाचार रोखण्यात अयशस्वी झाल्याबद्दल अनेकांनी “कल तक” च्या होस्ट आणि कर्मचार्‍यांचा निषेध करून टीका केली आहे.

 

 

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा