26 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरविशेष‘स्टीव्ह स्मिथ आमच्या पिढीतील सर्वोत्तम कसोटी फलंदाज’

‘स्टीव्ह स्मिथ आमच्या पिढीतील सर्वोत्तम कसोटी फलंदाज’

भारताचा शैलीदार फलंदाज विराट कोहलीचे कौतुकोद्गार

Google News Follow

Related

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथबाबत कौतुकोद्गार काढले आहेत. ‘स्टीव्ह स्मिथ हा या पिढीतील सर्वोत्तम कसोटी फलंदाज आहे. जगात स्मिथसारखा सातत्यपूर्ण खेळ करणारा दुसरा फलंदाज नाही,’ असे तो म्हणाला. त्याची गेल्या १० वर्षांतील सातत्यपूर्ण कामगिरीच त्याला अन्य फलंदाजांपासून वेगळी ठरवते, असेही कोहली याने सांगितले. स्टीव्ह स्मिथने ९५ धावांची नाबाद खेळी कसोटी अजिंक्यपद अंतिम लढतीच्या पहिल्या दिवशी केली. त्यावरून विराटने त्याचे कौतुक केले आहे.

लंडनमधील ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याआधी कसोटीने हे मत व्यक्त केले. ‘माझ्या मते, स्टीव्ह स्मिथ हा या पिढीतील सर्वोत्तम कसोटीपटू आहे. तुम्ही या पिढीतील कोणताही क्रिकेटपटू बघा, पण स्मिथ याची जुळवून घेण्याची क्षमता अतिशय उत्तम आहे, हे त्याने दाखवून दिले आहे,’ असे मत कोहली याने मांडले.

‘स्मिथचा विक्रम सर्वांनाच माहीत आहे. ८५-९० कसोटी सामन्यांमध्ये त्याची सरासरी ६० आहे, जी अविश्वसनीय आहे. तो ज्या सातत्याने आणि परिणामकारकरीत्या धावा करतो, तसे मी गेल्या १० वर्षांत कोणत्याही कसोटी खेळाडूला करताना पाहिले नाही. याचे श्रेय त्याचे कौशल्य आणि नैसर्गिक गुणवत्तेला आहे,’ असे कोहली म्हणाला.

हे ही वाचा:

लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारिक केले

शतकवीर हेड आणि स्मिथची अडीचशे धावांची भागीदारी

आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा, रेपो रेट जैसे थे स्थितीत

दूरदर्शनवरील प्रसिद्ध वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचे निधन

ओव्हलवर खेळताना, स्मिथने अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन डावाला पडझड होण्यापासून वाचवले. स्मिथने ट्रॅव्हिस हेडसह एकत्रितपणे २५१ धावांची भागिदारी रचली. स्मिथने २२७ चेंडूंत नाबाद ९५ धावा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने ३२७/३ अशी मजल मारली. स्मिथचा या मैदानात वेगळा विक्रमही आहे. त्याच्या खात्यात या मैदानावर आता ४८६ धावा आहेत आणि चार कसोटी सामन्यांमध्ये १२१.५ची सरासरी आहे. ओव्हलवर त्याने आधीच दोन शतके झळकावली आहेत आणि तिसऱ्या शतकासाठी तो सज्ज दिसत आहे.

३४ वर्षीय स्मिथने ९६ कसोटींमध्ये ५९.८०च्या सरासरीने ३० शतके आणि ३७ अर्धशतकांसह आठ हजार ७९२ धावा केल्या आहेत. तर, कोहली याने १०८ कसोटींत २८ शतके आणि २८ अर्धशतकांसह ४८.९३च्या सरासरीने आठ हजार ४१६ धावा केल्या आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा