24 C
Mumbai
Friday, January 23, 2026
घरविशेषविष्णू गणेश पिंगळे हे शहीद भगतसिंगांचे गुरू होते! मोहन शेटे यांनी...

विष्णू गणेश पिंगळे हे शहीद भगतसिंगांचे गुरू होते! मोहन शेटे यांनी सांगितला इतिहास

क्रांतिकारक पिंगळे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

Google News Follow

Related

शुरांच्या गोष्टी लहान वयातच ऐकल्याने त्याचा पिढीला फायदा होत असतो. क्रांतिकारकाचे खरे वारसदार हे सैनिकच आहेत. शहीद भगतसिंगांचे गुरु,आदर्श हे विष्णू गणेश पिंगळे हे होते. घुमान शहरांतील संत साहित्य संमेलनात घुमानचे महापौर म्हणाले, संत नामदेव यांनी भक्तीचा मार्ग पंजाबपर्यंत पोहोचवला परंतु फार पूर्वी पिंगळे यांनी क्रांतीचा मार्ग पंजाबला दाखवला, अशा शब्दांत प्रमुख व्याख्याते व इतिहास संशोधक मोहन शेटे यांनी क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांच्या जयंतीदिनी त्यांच्या जाज्ज्वल्य इतिहासावर भाष्य केले. यावेळी प्रमुख उपस्थिती होती मिलिंद भाऊ एकबोटे आणि उमाकांत पिंगळे यांची.

तळेगाव ढमढेरे ता. शिरूर, जिल्हा पुणे येथे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे उत्सव समिती शिरूर यांनी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या जयंती निमित्त अभिवादन सभा घेण्यात आली. गावातून मशाल घेऊन स्मारकात आल्यानंतर अभिवादन करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोहन शेटे बोलत होते.

ते म्हणाले की, पिंगळे यांनी तळेगाव ढमढेरे,कोल्हापूर,तळेगाव दाभाडे येथे प्राथमिक शिक्षण घेतले. पुण्यामध्ये लोकमान्य टिळक व सावरकर यांच्याबरोबर विदेशी कपड्यांची होळी केली. स्वदेशी कपड्यांसाठी औसा येथे जपान टेक्निकलचा हातमाग वस्त्र उद्योग सुरू केला. पिंगळे यांनी अमेरिकेत वाशिंग्टन येथे मेकॅनिकल इंजिनिअरचे शिक्षण घेतले. अंधश्रद्धा सोडून विज्ञानवादी विचार आत्मसात करावे. अमेरिकेत पंजाब मधील सरदार लोकांनी गदर पार्टीची स्थापना केली. लाला हरदयाळ ,पांडुरंग सदाशिव खांडखोजे आधी त्यामध्ये सदस्य होते. जर्मन व इंग्लंड यांच्या पहिले महायुद्ध होणार आहे, याचा फायदा घेऊन आपण मातृभूमीला स्वतंत्र करू शकतो, असा असा अंदाज घेऊन अनेक वेशभूषा बदलून कलकत्ता, मिरत, बनारस ,पंजाब, उत्तर भारत, लाहोर, अमृतसर ,दिल्ली येथे क्रांती उठावासाठी फिरले. मी फक्त भारत मातेला जीवन समर्पित केले आहे, असे ते म्हणत असत. असे म्हणाले लष्करातील भारतीय सैनिकानां स्वतंत्र्यासाठी प्रवृत्त केले. मराठी, इंग्रजी, पंजाबी, तामिळ, बंगाली अशा भाषेत पिंगळे पारंगत होते.

हे ही वाचा:

काश्मीरचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा पुनरुज्जीवित करण्यासाठी कटिबद्ध

कर्नाटकात बस भाडेवाढ, आता पत्नीसाठी बस मोफत, पतीला दुप्पट भाडे!

छत्तीसगडमध्ये तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

चक्क ‘सामना’ म्हणतोय, देवाभाऊ अभिनंदन!

शेटे यांनी सांगितले की, गद्दारीमुळे पिंगळे हे इंग्रजांच्या तावडीत सापडले. त्यांनी सांगितले की, काही सदस्यांकडून गद्दारी होऊन मेरठ येथे ते पकडले गेले. जी पेटी उशाला घेऊन झोपले होते, त्या पेटीत १८ बॉम्ब सापडले होते. कट कारस्थान केल्याच्या गुन्ह्यामध्ये त्यांना १६ नोव्हेंबर १९१५ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली.

शेटे यांनी आवाहन केले की, विद्यार्थ्यांनी ऑलिंपिक स्पर्धेत भाग घ्यावा, शास्त्रज्ञ व्हावे, साहित्यिक व्हावे व उच्च दर्जाचे राजकीय नेतृत्व करावे आणि त्यानंतर हे कसे जमलेअसे कुणी विचारले तर त्यांना विष्णू गणेश पिंगळे यांच्या जन्मभूमीतून आलो आहे हे अभिमानाने सांगावे.  विद्यार्थ्यांनी आपला आदर्श व्यक्ती क्रांतिकारकांना मानावे, असे आवाहनही शेटे यांनी केले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून तळेगावचे सरपंच अंकिता भुजबळ ,उमाकांत पिंगळे , मिलिंद एकबोटे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतचे आजी-माजी सदस्य, जयंती समितीचे कार्यकर्ते, आजी-माजी सैनिक संघटना , रायकुमार बी. गुजर प्रशाला व संभाजी भुजबळ माध्यमिक विद्यालय तसेच कुमार जयसिंगराव ढमढेरे प्राथमिक विद्यालय अशा सर्व शाळेतील विद्यार्थ्यांचा व पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा मोठा सहभाग होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निमगाव माळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांनी केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा