25 C
Mumbai
Monday, January 26, 2026
घरविशेषव्हॉट्सऍप बिना जिया जाए ना!

व्हॉट्सऍप बिना जिया जाए ना!

Google News Follow

Related

रात्री व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम बंद पडले आणि काळजाचा ठोकाच चुकला. काय करावे कळेनासे झाले. कुणाला नेमके विचारावे, कसे विचारावे काहीच मार्ग सापडत नव्हता. डोक्यात असंख्य विचार सुरू झाले. किती काळ आपण या सोशल मीडियापासून दूर राहणार. दुसरीकडे ट्विटर तर सुरू होते, पण तो म्हणजे या अंधःकारातील मिणमिणता दिवा. व्हॉट्सऍपची मजा त्यात नाही. अनेक मित्रांना शुभरात्रीचा मेसेज पाठवायचा होता, काही जणांचे मेसेजेस जे सकाळी कामामुळे पाहाता आले नाहीत ते पाहायचे होते. त्या व्हॉट्सऍपचा सर्व्हर डाऊन झाला होता. मोठी पंचाईत करून ठेवली या व्हॉट्सअपने.

सगळी कामेच खोळंबली. एकदा का सगळ्यांना शुभ रात्री, गुडनाईटचे मेसेज केले की, कशी शांत झोप लागत असे. पण कर्मा हे काय झाले? डोळ्याला डोळा लागत नव्हता. सगळे जगच थांबल्यासारखे वाटत होते. एकप्रकारचा लॉकडाऊनच लागल्यासारखी भावना होती. गेल्या वर्षी २२ मार्चला जसा भारतात एक दिवसाचा लॉकडाऊन लागला आणि जग काहीकाळ थांबले तसेच काहीसे झाले. मेसेजेस पाठविण्यासाठी, सर्फिंग करण्यासाठी उत्सुक असलेली बोटं थरथरू लागली. डोळे मेसेजेस बघण्यासाठी आतूर होते. टीव्ही लावला, एक गाणे सुरू झाले होते, गडबडीत टीव्हीच्या स्क्रीनवर अंगठा फिरवून चॅनल बदलण्याचा प्रयत्न केला. बायको मागून ओरडली…अहो, तो मोबाईल नाही टीव्ही आहे. बंदुकीत गोळ्या नसतील तर बंदूक जशी निरुपयोगी तसंच अगदी मोबाईलबद्दल वाटू लागलं. व्हॉट्सऍप नाही, फेसबुक नाही काय करायचं त्या फोनचं? सगळ्या जगाशीच जणू संपर्क तुटला. आपण एकटे पडल्याची भावना निर्माण झाली. आपल्याला कुणीच नाही, ना मित्र, ना नातेवाईक…

सगळे कसे सुने सुने वाटू लागले. बायकोने छान चॉकलेट्स बनविली होती. त्याचे फोटोही काढले होते; पण शेअर तरी कुणाला करायचे? ते फोटो शेअर केल्यावर त्यावर येणारे थम्सअप, स्मायलींचा पाऊस या सगळ्याला मुकलो. व्हॉट्सऍपवर स्टेटस टाकता येणेही मुश्कील झाले. मी काय करतोय, हे सगळ्यांनी पाहावे, त्यावर लगेच प्रतिक्रिया द्याव्यात असे मनापासून वाटत होते.  जवळपास १०० लोकांनी स्टेट्स पाहिले की ऊर कसा भरून यायचा. पण स्टेटस टाकायचे तरी कसे? फेसबुकवरच्या पोस्टही वाचायच्या राहिल्या होत्या, चार दोन कमेन्ट करायच्या होत्या, कुणाला तरी ज्ञान द्यायचं होतं, पण कसलं काय, सगळंच ठप्प.

हे ही वाचा:

‘स्वतःच्या मुलाला काही शिकवले नाही, तुमच्या चाहत्यांच्या मुलांना कसे शिकविणार’

देगलूरसाठी काँग्रेसकडून घराणेशाही; रावसाहेब अंतापूरकरांच्या मुलाला उमेदवारी

ईडीसमोर हजर राहण्यासाठी भावना गवळींना हवे अजून १५ दिवस!

… उडाली उडाली लस उडाली!

मार्क झुकेरबर्गसाठी तोंडात शिव्या आल्या. काय केलंस हे? आमच्या आनंदावर विरजण टाकलंस. सगळंच संपल्यासारखं वाटत होतं. शेवटी रात्र जागून काढली. झोपण्याचा प्रयत्न केला, पण हात मोबाईलकडेच जात होता. पुन्हा पुन्हा मोबाईल पाहिला पण व्हॉट्सअप, फेसबुकचे शटर डाऊनच. व्हॉट्सऍपची नोटिफिकेशन टोन आता वाजेल नंतर वाजेल या आशेने रात्र तळमळत काढली. सकाळ झाली. पुन्हा व्हॉट्सऍप, फेसबुक सगळं सुरू झालं होतं. चेहरा खुलला. आता चित्त थाऱ्यावर नव्हतं. कधी एकदा सगळ्यांना मेसेज पाठवतो, त्यांचे मेसेज बघतो. रिप्लाय करतो असं होऊन गेलं. तहानभूक हरपली. बायकोने केलेल्या चॉकलेट्सचे फोटो शेअर केले, स्टेटस अपडेट केले. भराभर त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या.  …आणि डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागले. जगण्याला अर्थ प्राप्त झाला!

मविआ

(अर्थात, महेश विचारे आपला)

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा