28 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरविशेष'या' देशांमध्ये पेजर्सचा अजूनही होतोय वापर, वापरण्याची कारणेही आलीत समोर!

‘या’ देशांमध्ये पेजर्सचा अजूनही होतोय वापर, वापरण्याची कारणेही आलीत समोर!

टेक्नोलॉजीच्या दुनियेत २०-२५ वर्षांपूर्वीचे उपकरण 'पेजर' पुन्हा एकदा चर्चेत

Google News Follow

Related

लेबनॉन आणि सीरियाच्या काही भागात हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांकडील हजारो पेजर्सचा (१७ सप्टेंबर) एकाच वेळी स्फोट झाल्याने ९ जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे ३००० लोक जखमी झाले. टेक्नोलॉजीच्या दुनियेत २०-२५ वर्षांपूर्वीचे उपकरण ‘पेजर’ (PAGER) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सध्याच्या युगात प्रचलित नसलेल्या पेजरचा अजूनही जगभरात अनेक उद्देशांसाठी वापर केला जात आहे.

पेजर्स म्हणजे काय?
पेजर हे एक लहान वायरलेस कम्युनिकेशन डिव्हाइस आहे, जे विशेषतः संदेश पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी वापरले जाते. त्याला बीपर देखील म्हटले जाते. पेजर्सचे तीन प्रकार (वन-वे पेजर, टू-वे पेजर, व्हॉईस पेजर) आहेत. पेजर रेडिओ फ्रिक्वेन्सीवर कार्य करते, त्यामुळे खराब नेटवर्क असलेल्या भागात ते अधिक कार्यक्षम पर्याय बनतात. तसेच त्याची बॅटरीही दीर्घकाळ चालते. १९८० आणि १९९० च्या दशकात जेव्हा मोबाईल फोनचा प्रवेश मर्यादित होता, तेव्हा पेजरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता.

भारताच्या बाजारपेठेत पेजरने १९९१ मध्ये प्रवेश केला. संदेश दळण-वळणासाठी वापरल्या जाणाऱ्या पेजरची भारतात एक वेगळीच छबी निर्माण झाली होती. ज्या व्यक्तीकडे पेजर आहे तो व्यक्ती श्रीमंत मानला जात होता. दरम्यान, पेजरची जागा मोबाईल फोनने घेतल्यानंतर पेजरची ओळख नाहीशी झाली. मात्र, अजूनही असे काही देश आहेत, ज्या ठिकाणी पेजरचा वापर केला जात आहे.

हे ही वाचा : 

मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मालोकरच्या बरगड्या मोडल्या होत्या! हृदयविकाराने मृत्यू नाही

छे छे, राहुल गांधी दहशतवादी नाहीत…

इस्रो आता शुक्रावरची गुपितं उलगडणार; चांद्रयान- ४ मोहिमेलाही हिरवा कंदील

कोचिंग सेंटरच्या नावाखाली ख्रिश्चन धर्मांतराचा कट, ११ मुलांची सुटका !

 

या देशांमध्ये पेजर्सचा होतोय वापर 

जपान: आरोग्य सेवा आणि अत्यावश्यक सेवांमध्ये पेजरचा वापर केला जातो. आपत्कालीन परिस्थितीत पेजरला स्मार्टफोनपेक्षा अधिक विश्वासार्ह मानले जाते.

यूएसए: अमेरिकेतील हॉस्पिटल आणि हेल्थकेअर क्षेत्रात पेजरचा वापर अजूनही केला जातो.

ब्रिटन: येथील नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये पेजर्सचा अधिक वापर केला जातो. हजारो पेजर्स अजूनही येथे सक्रिय आहेत.

कॅनडा: कॅनडामधील आरोग्य सेवा आणि दुर्गम भागात पेजर्सचा वापर केला जातो. याशिवाय इतरही अनेक देश आहेत जिथे आरोग्य क्षेत्रात पेजरचा वापर होत आहे.

जर्मनी: मोबाइल सिग्नल कमकुवत असल्याने लॉजिस्टिक कंपन्यांमध्ये पेजर्सचा वापर केला जातो.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा