26 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरविशेषसीएए लागू झाल्यानंतर बंगालमधील मतुआ समाजाचा जल्लोष!

सीएए लागू झाल्यानंतर बंगालमधील मतुआ समाजाचा जल्लोष!

ममता बॅनर्जी देखील आता मतुआ समाज आता वंचित ठेवू शकत नाही, भाजपनेते सुवेंदू अधिकारी

Google News Follow

Related

नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए देशभरात लागू झाल्याने पश्चिम बंगालमधील मतुआ समुदायाच्या नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.भाजपने मतुआ शरणार्थींना कायस्वरूपी नागरिकत्व देण्याची दीर्घकाळापासून सुरू असलेली मागणी पूर्ण करण्यासाठी सीएएला पाठिंबा देऊन शरणार्थी कार्डाचा वापर केला होता. गेल्या काही वर्षांत भाजपने बंगालमध्ये राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी)संदर्भात आक्रमक भूमिका घेतली होती.

मतुआ समुदायाने या मुद्द्यावर भाजपचे समर्थन केले आहे आणि तेव्हापासून सीएएला लवकरात लवकर लागू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता सीएए लागू झाल्यामुळे मतुआ समाज आनंदोत्सव साजरा करतो आहे.‘संसदेत मंजूर झालेला सीएए आता देशभरात लागू होईल आणि हा कायदा संपूर्ण देशभरात लागू होईल.

मतुआ समाजाची दीर्घकाळापासून सुरू असलेली मागणी आता पूर्ण होईल. आता त्यांना नागरिकत्व मिळेल आणि कोणीही त्यांना अधिकारापासून वंचित ठेवू शकणार नाही. इतकेच काय ममता बॅनर्जीही नाही. मतुआ समाज आणि अखिल भारतीय मतुआ महासंघाला माझ्या शुभेच्छा,’ अशी प्रतिक्रिया भाजपनेते सुवेंदू अधिकारी यांनी दिली आहे.

हे ही वाचा..

संदेशखाली प्रकरणी सीबीआयच्या चौकशी आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!

अजित डोभाल आणि नेतान्याहू यांची भेट

आफ्रिकी-अमेरिकी गायिकेकडून सीएएचे समर्थन!

कर्नाटकमध्ये कॉटन कँडी, कोबी मंच्युरियनमध्ये कृत्रिम खाद्यरंग वापरण्यास बंदी

कोण आहेत मतुआ समाजाचे लोक?
हरिचंद ठाकूर यांनी मतुआ संप्रदायाची स्थापना केली होती. त्यांचे उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील ठाकूर कुटुंबाशी दीर्घकाळापासून संबंध राहिले आहेत. हरिचंद ठाकूर यांचा पणतू प्रमथ रंजन ठाकूर यांनी १९६२मध्ये बंगालमधून काँग्रेसचे आमदार झाले. गेल्या काही वर्षांत ठाकूर कुटुंबीयांच्या अनेक सदस्यांनी संप्रदायाची सर्वोच्च संस्था मतुआ महासंघामध्ये आपल्या प्रभावाचा वापर करून राजकारणात आपले नशीब आजमावले आहे.

प्रमथ रंजन ठाकूर यांचे मोठे पुत्र कपिल कृष्ण ठाकूर सन २०१४मध्ये बोनगावमधून तृणमूलचे खासदार होते. त्यानंतर त्यांचे छोटे भाऊ मंजुल कृष्णा सन २०११मध्ये तृणमूलचे आमदार झाले. तर, मंजुल कृष्णा यांचे पुत्र शंतनू ठाकूर भाजपच्या तिकिटावर लोकसभेत जिंकून गेले. ते सध्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा