ईरान पुन्हा एकदा अणुकराराच्या मुद्द्यावर फ्रान्स, जर्मनी आणि युनायटेड किंगडम यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार झाला आहे. ही महत्त्वाची बैठक २५ जुलै रोजी इस्तांबुलमध्ये होणार आहे. युरोपातील या तीन प्रमुख शक्तींना एकत्रितपणे ‘ई3’ या नावाने ओळखले जाते. ई3 देशांनी याआधीच ईरानला इशारा दिला होता की जर त्यांनी चर्चा सुरू केली नाही, तर त्यांच्यावर पुन्हा आंतरराष्ट्रीय निर्बंध लादले जातील.
ईरानच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी ईरानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांच्या हवाल्याने सांगितले की ईरान, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी यांच्यात उपपरराष्ट्रमंत्री स्तरावर बैठक होईल. जून महिन्यात इस्रायल आणि अमेरिका यांनी ईरानच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ला केला होता. या हल्ल्यांनंतर ई3 देशांचे परराष्ट्र मंत्री आणि युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरणप्रमुख यांनी ईरानचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी गुरुवारी बैठक घेतली – जी या संघर्षानंतरची पहिली बैठक होती.
हेही वाचा..
सुप्रीम कोर्टात आज ‘उदयपूर फाइल्स’ चित्रपटप्रकरणी सुनावणी होणार
दिल्ली उच्च न्यायालयात ६ नव्या न्यायाधीशांची नियुक्ती
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला ‘सुप्रीम’ दिलासा
गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब !
ईरानने अमेरिकेवर आरोप केला आहे की, ते इस्रायली हल्ल्यांमध्ये सहभागी होते. या हल्ल्यांमध्ये ईरानचे अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी, अणुशास्त्रज्ञ आणि नागरिक ठार झाले होते. अमेरिकेने दावा केला आहे की त्यांनी ईरानच्या तीन अणु प्रकल्पांना नष्ट केले आहे. ईरान आणि इस्रायलमधील युद्धानंतर २४ जुलैला शस्त्रसंधी (सीजफायर) घोषित करण्यात आले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच इशारा दिला होता की जर ईरानने पुन्हा त्यांचा अणुउर्जा कार्यक्रम पुढे सुरू केला, तर अमेरिका कोणतीही पूर्वसूचना न देता बमवर्षाव करू शकते.
ईरान-इस्रायल युद्धाच्या आधी तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यात ओमानच्या मध्यस्थीने पाच फेऱ्यांच्या अणुचर्चा झाल्या होत्या. मात्र, यामध्ये युरेनियम संवर्धन (यूरेनियम एनरिचमेंट) यासारख्या मुद्द्यांवर मतभेद कायम राहिले. २०१५ मध्ये झालेल्या अणुकरारात चीन, रशिया आणि हे तीन युरोपीय देश (ई3) हे सर्व ईरानसोबत भागीदार होते.







