‘शिवसेना’ पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह नेमका कुणाचा याविषयी आज (१४ जुलै) सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी पार पडली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठे विधान केले. आता अर्ज दाखल करणे बंद करा, २ वर्षांपासून बंद असलेले प्रकरण त्याचा निकाल किंवा त्याची मुख्य सुनावणी आपण ऑगस्ट महिन्यात घेवू असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितले. प्रकरणाची सुनावणी पार पडल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना वकील शिंदे बोलत होते.
ते म्हणाले, या प्रकरणाची ऑगस्टमध्ये सुनावणी होईल त्याच्यानंतर निकाल राखून ठेवला जाईल. ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर-ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबरमध्ये लागु शकतो. सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट केले कि २ वर्षे झाली आहेत आणि याचा आम्हाला सोक्षमोक्ष लावायचा आहे. त्यामुळे आता ऑगस्टमध्ये आपल्याला समजेल कि पक्ष आणि चिन्ह शिंदे यांच्याबरोबर राहते कि उद्धव ठाकरेंकडे जाते.
ऑगस्टमध्ये निकाल अपेक्षित करू नका, असे माझे मत आहे. त्यावेळेस तारीख मिळेल, सुनावण्या होतील, जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर या वर्षा अखेरीस याबाबत सर्व निकाल स्पष्ट होईल. जर निवडणुका आल्या तर आहे तशी परिस्थिती राहील आणि सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात निकाल आला तर त्या-त्या परिस्थितीनुसार सर्व होईल.
हे ही वाचा :
कांवड यात्रा : “भाविकांची सुविधा व सुरक्षा सर्वोपरि”
नर्स निमिषा प्रिया प्रकरणी आज सुनावणी
‘बोल बम’च्या जयघोषाने दुमदुमले देवघर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच ऑक्टोंबर-नोव्हेंबर होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ऑगस्टमध्ये याचा निकाल येण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून पूर्ण प्रयत्न असेल. यावेळी शिंदे गटाचे म्हणणे होते कि, हे (ठाकरे) दोन वर्षे झोपा काढत होते, काहीच केले नाही. आता सुप्रीम कोर्टाने म्हटले कि ऑगस्टमधील दोन-तीन दिवसात तारीख देवू. त्यामुळे लवकरच निकाल समोर येईल हे नक्की, असे वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले.







