32 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरविशेषसनातन धर्माविरोधात बोलणाऱ्यांबद्दल राहुल गांधी गप्प का ? बीआरएसच्या के. कविता यांचा...

सनातन धर्माविरोधात बोलणाऱ्यांबद्दल राहुल गांधी गप्प का ? बीआरएसच्या के. कविता यांचा सवाल

बीआरएसच्या नेत्या के. कविता यांचा सवाल

Google News Follow

Related

सनातन धर्म आणि हिंदी विरोधी वक्तव्य केल्याच्या मुद्द्यावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी गप्प का आहेत? गांधी यावर स्पष्ट बोलावे आणि ते हिंदू आणि गरीब विरोधी नसल्याचे सिद्ध करावे, असे आवाहन भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांनी केले आहे. डीएमके खासदार दयानिधी मारन यांच्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या सनातन धर्माच्या टिप्पण्यांबाबत सुद्धा राहुल गांधी यांनी  मौन बाळगले होते. राहुल गांधी भारत जोडो यात्रेबद्द्ल सतत अनेक विधाने करत असतात. त्यांची ही भारत जोडो यात्रा म्हणजे पीआर स्टंटसारखी वाटते, कारण सनातन धर्मावर हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्यावर गांधी यांनी उभे राहून बोलायला हवे होते, असेही कविता म्हणाल्या.

द्रमुक खासदाराने संसदेत हिंदी भाषिक राज्यांना गोमुत्र राज्ये म्हणून संबोधले होते. द्रमुक आणि त्यांच्या मित्र पक्षांकडून वेळोवेळी अशा हिंदी विरोधी आणि सनातन विरोधी वक्तव्य करत असतात. त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. यावर आधी गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. निदान आता तरी गांधी यांनी आपण हिंदू, गरीब आणि कामगार विरोधी नसल्याचे जाहीर करावे. जर राहुल गांधी यांनी सनातन धर्म या वादावर प्रतिक्रिया दिली असती तर अशी विधाने इतरांनी केली नसती. हि विधाने इतक्या सहज घेऊ नयेत, असेही त्या म्हणाल्या.कॉंग्रेस पक्ष हा निवडणुका झाल्या कि दिलेली आश्वासने विसरणारा पक्ष आहे. त्यांनी कर्नाटकमध्ये हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्यावर काहीही झालेले नाही. शैक्षणिक संस्थामध्ये हिजाब बंदी उठवण्याचे दिले होते त्याबद्दल ते संभ्रमात असल्याचे दिसते.

हेही वाचा.. 

इस्राइलच्या बॉम्बवर्षावात गाझातील ७० लोक ठार

‘न्यूज क्लिक’ प्रकरणी एचआर विभागाचे प्रमुख सरकारी साक्षीदार होण्यास तयार

यावर्षी २०२ वाघांचा मृत्यू, एका दशकातील सर्वाधिक वाढ!

७०० रुपयात थार गाडी दिली तर माझे दिवाळेच निघेल!

तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविरुद्ध (हिंदू धर्म) निंदनीय टिप्पणी केली आणि धर्माचे उच्चाटन करण्याचे आवाहन केले. काँग्रेसचे सहयोगी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांचे हे पुत्र आहेत. त्यांनी सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि कोरोना सारख्या रोगांबरोबर केली होती. केवळ असे स्टॅलिन इंडी आघाडीत नाहीत तर सनातन धर्माविरोधात बोलणारे सीपीआय (एम), कॉंग्रेस, सपा, आरजेडी आणि व्हीसीके मधील अनेक नेत्यांनी सनातन धर्माविरोधात द्वेषपूर्ण भाषणे केली आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान डीएमके खासदार सेंथिल कुमार यांनी भारताच्या उत्तर भागातील हिंदी भाषिक राज्यांची खिल्ली उडवणारी भाषा केली होती. नुकत्याच समोर आलेल्या एका जुन्या व्हिडिओमध्ये दयानिधी मारन यांनी हिंदी भाषिक राज्यांमधून तामिळनाडूत येणाऱ्या स्थलांतरितांविरुद्ध निंदनीय भाषा केली आहे. ते असे म्हणाले आहेत कि, हिंदी भाषिक लोक आमच्यासाठी शौचालये आणि रस्ते स्वच्छ करत असतात, असे त्या व्हिडीओमध्ये असल्याचे कविता यांनी म्हटले आहे.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा