27 C
Mumbai
Thursday, December 11, 2025
घरविशेषजिहादी पद्धतीने वातावरण खराब करणाऱ्या कट्टरपंथीयांकडून वस्तू खरेदी करणार नाही

जिहादी पद्धतीने वातावरण खराब करणाऱ्या कट्टरपंथीयांकडून वस्तू खरेदी करणार नाही

नागपूरमध्ये हिंदू समाजाच्या लोकांनी केला संकल्प

Google News Follow

Related

नागपूरमध्ये औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी म्हणून सोमवारी हिंदू संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. मात्र, सायंकाळी अचानक नागपूरमध्ये हिंसाचार उसळला. यात दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या. पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारीही जखमी झाले. या तपासादरम्यान केवळ हिंदूंच्या गाड्यांना, दुकानांना जाळपोळीसाठी आणि तोडफोडीसाठी लक्ष्य करण्यात आल्याची बाब समोर आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत भाष्य करत हा प्रकार समोर आणला. काही प्रत्यक्षदर्शींनीही केवळ हिंदूंना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले. यानंतर सर्वत्र संताप पसरला असून हिंदू समजानेही आता संकल्प केला आहे.

जिहादी पद्धतीने वातावरण खराब करणाऱ्या कट्टरपंथी लोकांकडून वस्तू खरेदी करणार नसल्याचा संकल्प हिंदू समाजाच्या लोकांनी केला आहे. नागपूरमध्ये हिंदू समाजाच्या लोकांनी एकत्र येत जय श्री राम, छत्रपती संभाजी महाराज यांच्या घोषणा देत हा महत्त्वाचा संकल्प केला आहे. नागपूरमध्ये हिंदूंच्या दुकानांची तोडफोड करणाऱ्या कट्टरपंथीयांकडून वस्तू खरेदी करू नका, असं आवाहन करण्यात येत आहे.

नागपूरमध्ये जातीय हिंसा घडली असून त्यातूनचं लक्ष्य करून दुकाने तोडली गेली. हिंदूंची वाहने जाळली गेली ही अत्यंत निंदनीय घटना आहे. हिंदू समाजाला भाईचारा नक्कीच हवा आहे. पण हे लोक आपल्याला चारा बनवून स्वतः भाई बनत आहेत आणि म्हणूनचं हा संकल्प केल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, नागपूरमधील हिंसाचार प्रकरणात फहीम खान याचे मास्टरमाइंड म्हणून नाव समोर आले आहे. नागपूर पोलिसांनी बुधवारी अल्पसंख्याक डेमोक्रॅटिक पार्टीचा (एमडीपी) स्थानिक नेता फहीम शमीम खान याला अटक केली. औरंगजेबाच्या कबरीवरून १७ मार्च रोजी झालेल्या हिंसाचारमागे फहीम शमीम खान असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी फहीम खानला २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडीही सुनावण्यात आली. यानंतर फहीम खानसह ५० आरोपींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशविघातक कृत्य केल्याप्रकरणी हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. नागपूर सायबर पोलिसांनी मध्यरात्री हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला.

हे ही वाचा :

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार

अमोल मिटकरी हे औरंगजेबाच्या कुटुंबातले!

दिशा सालियन प्रकरणातील याचिका पाच वर्षांनी दाखल का? वकील निलेश ओझा यांनी दिले स्पष्टीकरण

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले; दोन वेगळ्या चकमकींमध्ये २२ नक्षलवाद्यांचा खात्मा

गणेशपेठ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये फहीम खानचे नाव अधिकृतपणे समाविष्ट झाल्यानंतर काही तासांतच त्याला अटक करण्यात आली. आदल्या दिवशी पोलिसांनी त्याचे छायाचित्र आणि हिंसाचार सुरू होण्यापूर्वी खान कथितपणे प्रक्षोभक भाषण देत असल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध केले होते. यामध्ये तो चिथावणीखोर भाषण देताना दिसत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा