24 C
Mumbai
Saturday, January 10, 2026
घरविशेष१५०० लोकसंख्येमागे २७,३९७ जन्मांची नोंद; लाभार्थ्यांमध्ये बांगलादेशी?

१५०० लोकसंख्येमागे २७,३९७ जन्मांची नोंद; लाभार्थ्यांमध्ये बांगलादेशी?

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याकडून एसआयटी चौकशीची मागणी

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यामधील ग्रामीण भागात जन्म नोंदणी घोटाळा उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेंदुरसाणी ग्रामपंचायतीकडून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे की, सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत नागरी नोंदणी प्रणाली (CRS) मध्ये १,५०० लोकसंख्येसाठी २७,३९७ जन्मांची नोंद झाली.

संबंधित प्रकरण हे पहिल्यांदा २४ नोव्हेंबर रोजी उघडकीस आले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) यांच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. कलम ३१८(४), ३३७, ३३६(३), आणि ३०४(२) आणि आयटी कायद्याच्या कलम ६५ आणि ६६ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बुधवारी (१७ डिसेंबर) गावाला भेट दिली आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, हजारो बांगलादेशी लाभार्थी असल्याचा संशय आहे. त्यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची विनंती केली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, नोंदींमध्ये आढळणारी बहुतेक नावे पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि आसपासच्या प्रदेशातील लोकांची आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले असून या सर्व जन्म नोंदी रद्द करण्याची मागणी केली आहे.

आर्णी येथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान CRS सॉफ्टवेअरमध्ये २७,३९७ जन्म नोंदी आणि सात मृत्यु नोंदी नोंदल्या गेल्या. ही संख्या गावाच्या प्रत्यक्ष लोकसंख्येच्या तुलनेत जास्त होती. परिणामी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मंदार पत्की यांना या विसंगतीबद्दल माहिती दिली. सीईओंनी पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन केली. समितीने गावात प्रत्यक्ष तपासणी केली, ज्यामध्ये असे आढळून आले की २७,३९७ जन्म नोंदी आणि सात मृत्यू नोंदी ग्रामपंचायतीच्या अधिकारक्षेत्रात येत नाहीत आणि त्या अत्यंत संशयास्पद मानल्या गेल्या.

हेही वाचा..

विकसित भारत – जी राम जी विधेयकाला लोकसभेत मंजुरी!

मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

ट्रम्प यांचा स्वतःची पाठ थोपटण्याचा विक्रम!

कदंबा नौदल तळाजवळ आढळला जीपीएस बसवलेला ‘सीगल’; संशोधन की हेरगिरी?

त्यानंतर, पुण्यातील आरोग्य सेवा उपसंचालकांनी तांत्रिक तपासणी सुरू केली. राज्य लॉगिन सिस्टीम वापरून केलेल्या तपासणीत असे दिसून आले की शेंदुरसानीचा सीआरएस आयडी मुंबईशी मॅप करण्यात आला आहे. त्यानंतर, हे प्रकरण नवी दिल्लीतील अतिरिक्त रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (एनआयसी) यांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आले. त्यांच्या मूल्यांकनानुसार, हे सायबर फसवणुकीचे प्रकरण होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा