उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या ४० मजुरांना वाचवण्यासाठी अद्याप शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बचाव मोहीम सुरू आहे. मजुरांना वाचविण्यासाठी बोगद्यात खोदण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अशातच आता सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी डोंगराच्या माथ्यावरून आणि इतर बाजूने खोदले जाणार आहे. उभ्या ड्रिलिंगसाठी चार ठिकाणे ठरवण्यात आली आहेत, तेथे पोहोचण्यासाठी ट्रॅक बांधण्याचे काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडे (BRO) सोपवण्यात आले आहे.
इंदूरहून आणलेले तिसरे आधुनिक ऑगर मशीन घटनास्थळी पोहोचले असून बोगदा बनवणारी सरकारी कंपनी नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. अडकलेल्या कामगारांची संख्या ४० नसून ४१ असल्याचे सांगितले आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील दीपक कुमार असे ४१ व्या कामगाराचे नाव आहे. परदेशी तज्ज्ञांच्या मदतीने केंद्र आणि राज्यातील सहा पथके आज(रविवार)पासून पाच पर्यायांवर काम सुरू करणार आहेत. सीएम पुष्कर सिंह धामी यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही सिल्काराला पोहोचणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव मंगेश घिलडियाल, माजी सल्लागार भास्कर खुल्बे, सूक्ष्म बोगदा तज्ञ ख्रिस कूपर, अभियांत्रिकी तज्ञ अरमांडो कॅपेलन यांच्यासह अनेक तज्ञ शनिवारी घटनास्थळी पोहोचले. कूपर हे सनदी अभियंता आहेत ज्यांना सिव्हिल इंजिनीअरिंग पायाभूत सुविधा, मेट्रो बोगदे, मोठी गुहा, धरणे, रेल्वे आणि खाणकाम अशा अनेक जागतिक प्रकल्पांचा अनुभव आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा
चॅट जीपीटीची पालक कंपनी ओपन एआयच्या सीईओला दाखविला बाहेरचा रस्ता
भारतीय क्रिकेट टीमचे ‘भगवे’ टी शर्ट ममता बॅनर्जींना नकोसे
मोहम्मद शमीच्या ट्रोलिंगमागे पाकिस्तानचा कट
राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लि. संचालक अंशू मनीष खालखो म्हणाले की, वरून ड्रिलिंगसाठी करण्यात आलेल्या वैज्ञानिक सर्वेक्षणांतर्गत सुमारे १०३ मीटर रुंदीच्या परिसरात ड्रिलिंग करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बोगद्याच्या वरच्या बाजूने उभ्या खोदण्याबरोबरच बाजूनेही ड्रिलिंग करण्याची योजना असल्याचे महामंडळाचे कार्यकारी संचालक संदीप सुगेरा यांनी सांगितले आहे. वरच्या बाजूने ड्रिलिंग करून कामगारांना अन्न आणि पाण्याचा पुरवठा केला जाईल. तर त्यांना बाजूने बाहेर काढले जाईल, अशी योजना आहे.







