30.8 C
Mumbai
Wednesday, June 10, 2026
घरक्राईमनामाउत्तर प्रदेशच्या 'लेडी सिंघम'चं खोट्या लग्नाच्या जाळ्यात

उत्तर प्रदेशच्या ‘लेडी सिंघम’चं खोट्या लग्नाच्या जाळ्यात

मेट्रोमोनियल साईटवरून झाली होती ओळख

Google News Follow

Related

मेट्रोमोनियल साईटवर खोटी माहिती दाखवून फसवणुक झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. उत्तर प्रदेशात एक महिला पोलीसचं या फसवणुकीच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसात तैनात असणाऱ्या महिला पोलिस उपअधीक्षक श्रेष्ठा ठाकुर या फसवणुकीची शिकार झाल्या आहेत. त्यांना एका व्यक्तीने आपण आयआरएस अधिकारी असल्याची बतावणी करून फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवाय त्या व्यक्तीने श्रेष्ठा ठाकुर यांच्याकडून लाखो रुपयेही लुबाडले आहेत.

श्रेष्ठा ठाकुर या सध्या उत्तर प्रदेश पोलिसात उपअधीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्या २०१२ बॅचच्या पीपीएस अधिकारी आहेत. सध्या त्या शामली येथे कार्यरत आहेत. त्यांना उत्तर प्रदेशमध्ये ‘लेडी सिंघम’ या नावानेही ओळखले जाते. तक्रारीनुसार, २०१८ मध्ये त्यांचे लग्न रोहित राज नावाच्या व्यक्तीसोबत झाले. श्रेष्ठा ठाकुर आणि रोहित यांची ओळख मेट्रोमोनियल साईटवरुन झाली होती. रोहितने स्वतःला २००८ बॅचचा आयआरएस अधिकारी असल्याचे म्हटले होते. शिवाय रांची येथे कार्यकरत असल्याचे त्याने सांगितलं होतं. श्रेष्ठा ठाकुरच्या कुटुंबियांनी रोहित आणि कुटुंबिंयाबद्दल चौकशीही केली होती. त्यानुसार २००८ मध्ये रोहित राज नावाचा व्यक्ती खरेच आयआरएससाठी सिलेक्ट झाला होता. तो रांची येथे कार्यरत आहे. त्यामुळे दिलेली माहिती खरी असल्याचे समजून त्यांनी पुढचे पाऊल टाकले.

हे ही वाचा..

ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीने ‘त्या’ विद्यार्थ्याला केले एका सत्रासाठी निलंबित

उत्तराखंड: हल्दवानी हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक पोलिसांच्या ताब्यात!

सिक्कीम येथील जत्रेत घुसला ट्रक, तीन ठार

निवडणूक निकालानंतर पाकिस्तानमध्ये निदर्शने; निकालविलंबाने गोंधळ वाढला

लग्नानंतर श्रेष्ठा ठाकुर यांना आपली फसणूक झाल्याचे कळले. आपला पती आयआरएस अधिकारी नसून त्याने फसवणूक करुन लग्न केल्याचं समजले. पण लग्न वाचवण्यासाठी त्यांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला. पण, रोहित राज याने श्रेष्ठा ठाकुर यांच्या नावाचा वापर करत अनेकांना फसवलं. अनेकांकडून पैसे लुबाडले. त्यामुळे श्रेष्ठा ठाकूर यांनी पोलिसांत तक्रार दिली. श्रेष्ठा ठाकुर यांनी घटस्फोट घेतला. सध्या रोहित विरोधात पोलीस तपास करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
312,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा