28.7 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरविशेषलस उत्सवात लसीकरणाचा नवा विक्रम, लसीकरण किती झाले? वाचा सविस्तर

लस उत्सवात लसीकरणाचा नवा विक्रम, लसीकरण किती झाले? वाचा सविस्तर

Google News Follow

भारतात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढतच आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला असून आतापर्यंत ११ कोटी १० लाख ३३ हजार ९२५ लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या लस उत्सवाच्या पहिल्या तीन दिवसातच कोरोनाच्या एक कोटीपेक्षा जास्त लसी देण्याचा विक्रम करण्यात आला आहे.

लस उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी, मंगळवारी २५ लाखाहून जास्त लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीत सांगण्यात आलंय की, देशात रोज ४५ हजार कोविड लसीकरण केंद्र सुरू असतात. मंगळवारी या केंद्रांच्या संख्येत जवळपास २१ हजाराची वाढ करण्यात आली असून ती ६७,८९३ इतकी करण्यात आली होती. लस उत्सवाच्या पहिल्या दिवशी ३० लाख डोस, दुसऱ्या दिवशी ४० लाख डोस आणि तिसऱ्या दिवशी २५ लाखाहून जास्त डोस देण्यात आले आहेत.

देशातील लसीकरणाचा कार्यक्रम १६ जानेवारीला सुरू झाला आहे. आतापर्यंत ११ कोटी ९० लाख ४८ हजार ७९ लोकांनी कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. महाराष्ट्रात कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या असून राज्यातही लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतल्याचं दिसून येत आहे.

हे ही वाचा:

आणखी काही मंत्र्यांचं बिंग फुटणार आहे. त्यांनाही राजीनामे द्यावे लागतील- मनोज कोटक

मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली

महामानवाला पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडून अभिवादन

मुख्यमंत्र्यांनी मेंदू तपासून घ्यावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनंतर १० एप्रिलपासून लस उत्सव सुरू करण्यात आला आहे. तो १४ एप्रिलपर्यंत सुरू राहिल. अधिकाधिक नागरिकांपर्यंत लस पोहोचवणं हा यामागचा मुख्य हेतू आहे. ‘लस उत्सव’ या मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या अनेक राज्यांतील नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन करण्यात येणार आहे. त्यासाठी काही नेतेमंडळींनीही पुढाकार घेत नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबतची जनजागृती करण्यासाठी योगदान दिलं आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा