29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
घरक्राईमनामाआणखी काही मंत्र्यांचं बिंग फुटणार आहे. त्यांनाही राजीनामे द्यावे लागतील- मनोज कोटक

आणखी काही मंत्र्यांचं बिंग फुटणार आहे. त्यांनाही राजीनामे द्यावे लागतील- मनोज कोटक

Google News Follow

Related

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यासाठी येणारे दिवस कठीण असतील, असे सूचक वक्तव्य भाजपा खासदार मनोज कोटक यांनी केले. येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही मंत्र्यांचं बिंग फुटणार आहे. त्यांनाही राजीनामे द्यावे लागतील, असा गर्भित इशारा मनोज कोटक यांनी दिला. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात मनोज कोटक यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापटलेल्या स्फोटकांचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणाचा आतापर्यंतचा एकूण घटनाक्रम पाहता भाजपा नेत्यांना अनेक गोष्टींची वेळेआधीच चाहुल लागल्याचे दिसून आले होते. त्यामुळे देशमुखांसाठी आगामी दिवस कठीण असतील, या मनोज कोटक यांच्या वक्तव्याचा अर्थ नक्की काय असावा, याविषयी सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत.

तर दुसरीकडे अनिल देशमुख हे आज केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) चौकशीला सामोरे जाणार आहेत. काहीवेळापूर्वीच ते ज्ञानेश्वरी बंगल्यावरुन सांताक्रुझच्या डीआयओच्या कार्यालयात जाण्यासाठी बाहेर पडले. आता ते डीआयओच्या कार्यालयात पोहोचले आहेत. त्यानंतर सीबीआयचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या चौकशीला सुरुवात करतील. अनिल देशमुख यांची चौकशी झाल्यानंतर सीबीआय सोमवारी प्राथमिक चौकशीचा अहवाल निष्कर्षासह उच्च न्यायालयात सादर करेल. त्यामुळे अनिल देशमुखांची चौकशी ही निर्णायक ठरणार आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली

महामानवाला पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडून अभिवादन

मुख्यमंत्र्यांनी मेंदू तपासून घ्यावा

मुख्यमंत्र्यांनी घोषणा करताना सर्व घटकांचा विचार केलेला नाही

सीबीआयने याप्रकरणात नुकतीच परमबीर सिंह आणि समाज सुधारक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांची चौकशी केली होती. त्यावेळी पालांडे यांनीच संजय पाटील आणि डीसीपी राजू पाटील यांना शंभर कोटी रुपये वसूल करण्यासंदर्भात सांगितले होते, अशी माहिती परमबीर सिंह यांनी सीबीआयला दिली होती. प्रत्येक बारकडून दोन ते तीन लाख रुपये वसूल झाले पाहिजेत, अशी अनिल देशमुख यांची अपेक्षा असल्याचे पालांडे यांनी दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले होते. या आरोपावर अनिल देशमुख काय बोलणार, हे पाहावे लागेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा