28 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरविशेषशुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणार गुजरात टायटन्स

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणार गुजरात टायटन्स

Google News Follow

Related

गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी आयपीएल २०२४ च्या तयारीला सुरुवात केली आहे. यंदाच्या मोसमात संघाची जबाबदारी शुभमन गिलवर असणार आहे. हार्दिक पांड्या गुजरात संघाला बाय बाय करून मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. पंड्याच्या नेतृत्वात संघ चॅम्पियन बनला होता. पण आता संघात बराच बदल झालेला आहे. गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही बराच बदल करण्यात येणार आहे. संघाचा सर्वोत्तम गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतग्रस्त असल्याने यंदा आयपीएल खेळू शकणार नाही.

गुजरातकडून शुभमनसोबत वृद्धिमान साहाला सलामीला संधी मिळू शकते. साहा हा अनुभवी खेळाडू आहे. गेल्या मोसमात त्याने चांगली कामगिरी केली होती. साहाने १७ सामन्यात ३७१ धावा ठोकल्या होत्या. तर २०२२ मध्ये त्याने ११ सामने खेळून ३१७ धावा केल्या होत्या. साहाच्या अनुभवाचा गुजरातला फायदा होऊ शकतो.

संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे यंदाच्या मोसमात खेळू शकणार नाही. शमीच्या टाचेवर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. शमीच्या अनुपस्थितीत गुजरात थोडे अडचणीत येऊ शकते. मात्र, गुजरातकडे मोहित शर्मासारखा चांगला गोलंदाज आहे. मोहितने गेल्या मोसमात चांगली कामगिरी केली होती. अर्थातच मोहितचे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान जवळपास निश्चित झाले आहे. गेल्या मोसमात त्याने १४ सामन्यांत २७ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता.

हेही वाचा :

कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अडचणीत आलेल्या अरविंद केजरीवालांना अटकपूर्व जामीन

कॅनडात भारतीय वंशाचे जोडपे, अल्पवयीन मुलीचा घरातील आगीत संशयास्पद मृत्यू

‘भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यासाठी दबाव आणणार नाही’

आयपीएलमधील सर्वात कंजूस गोलंदाज कोण?

डेव्हिड मिलर, केन विल्यमसन आणि राहुल तेवतिया यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. विल्यमसन आणि मिलर हे दोन अनुभवी फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत. त्याचबरोबर राहुल तेवतियाही चांगल्या कामगिरीमुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकतो. मिलरबद्दल बोलायचे झाले तर त्याने गेल्या मोसमात १६ सामन्यांत २५९ धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने १८ चौकार आणि १३ षटकार लगावले होते.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केन विल्यमसन, साई सुधारन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद/स्पेन्सर जॉन्सन, उमेश यादव, मोहित शर्मा

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा