29 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
घरराजकारणराज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार

राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये १७ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या शनिवारच्या बैठकीमध्ये सरकारने पोलीस दलासाठी महत्त्वचा निर्णय घेतला आहे. राज्य पोलीस दलामध्ये AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे. यासह संस्कृत, तेलुगू आणि बंगाली साहित्य अकादमी स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कॅबिनेट पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

 • राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी
 • तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार
 • मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला
 • १३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.
 • संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापणार
 • शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण
 • विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल
 • पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.
 • हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली मॅनहोलकडून मशीनहोलकडे योजना
 • संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार
 • राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार
 • ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान
 • भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप
 • संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार
 • वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन
 • राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी २० कोटी अतिरिक्त निधी मंजूर
 • श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

हे ही वाचा..

गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपा प्रवेश

‘माझ्या प्रिय कुटुंबातील सदस्य’ म्हणत नरेंद्र मोदींनी १४० कोटी भारतीयांना उद्देशून लिहिलं पत्र

षटक संपल्यानंतर ६० सेकंदांच्या आत पुढील षटकाला सुरुवात न केल्यास बसणार दंड

लष्कराचे गणवेश विकून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या संशयिताला अटक

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
146,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा