34 C
Mumbai
Thursday, October 29, 2026
घरविशेषखजिन्याच्या शोधासाठी निघाले होते, कारमध्ये मिळाले जळालेले तीन मृतदेह!

खजिन्याच्या शोधासाठी निघाले होते, कारमध्ये मिळाले जळालेले तीन मृतदेह!

पोलिसांचा शोध सुरु

Google News Follow

कर्नाटकातील तुमाकुरु जिल्ह्यात एका कारमध्ये तीन जळालेले मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.कारमधील जळालेले मृतदेह मंगळुरूच्या बेलथनगडी तालुक्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या तिघांनाही काही खजिन्याचे आमिष दाखवून लुटले गेले.यानंतर तिघांनाही कारमध्ये टाकून कार पेटवून देण्यात आली.तुमाकुरुचे पोलिस अधीक्षक अशोक केव्ही यांनी सांगितले की, या घटनेबाबत तपास पथकाला काही पुरावे मिळाले असून लवकरच आरोपी आमच्या ताब्यात असतील.

कुंचनी गावाजवळील तलावाच्या बाजूला जळालेल्या अवस्थेत एक कार उभी होती.कारचा शोध घेतला असता कारमध्ये तीन जळालेले मृतदेह आढळून आले.तिघांचीही हत्या अन्य ठिकाणी हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.तिघांचीही अन्य ठिकाणी हत्या करून मृतदेह कारमध्ये भरण्यात आले आणि कार पेटवून देण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी बरीच माहिती मिळाली असून लवकरच संपूर्ण खुलासा केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा :

‘आप’कडून अनैतिक राजकारणाचे उदाहरण’

पापुआ न्यू गिनीमध्ये शक्तिशाली भूकंप!

आयएसआयएसमध्ये सहभागी होण्यासाठी जाणारा आयआयटी गुवाहाटीचा विद्यार्थी ताब्यात!

कोलकात्याचा हैदराबादवर थरारक विजय!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे छुप्या खजिन्याचे प्रकरण आहे.आरोपींनी तिघांनाही खजिन्याचे आमिष दाखवून बोलावले होते.आरोपींनी त्या तिघांना सांगितले की, काही खजिना सापडला आहे.या खजिन्यामध्ये सोने आणि चांदी आहे आणि हे सर्व स्वस्त दरात विकायचे आहे.त्यानुसार हे तिघे आले असता त्यांच्याकडून पैसे लुटले अन त्यांचा खून केला.

मृत व्यक्तींची हत्या अन्य ठिकाणी झाल्याचे फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झाले असून या गुन्ह्यात एकूण सहा जणांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी बरीच माहिती मिळाली असून लवकरच संपूर्ण खुलासा केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा