29 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
घरविशेषकोलकात्याचा हैदराबादवर थरारक विजय!

कोलकात्याचा हैदराबादवर थरारक विजय!

हर्षित राणा ठरला सामन्याचा हिरो

Google News Follow

Related

शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठावर्धक झालेल्या सामन्यात कोलकात्याने हैदराबादचा चार धावांनी पराभव केला. कोलकात्याचा २२ वर्षीय हर्षित राणा या सामन्याचा हिरो ठरला.ईडन गार्डनवर रंगलेल्या या सामन्यांत २९ षटकारांचा वर्षाव झाला. तब्बल ४१२ धावा एकाच दिवशी झाल्या. अँड्रे रसेल याने २५ चेंडूंमध्ये ६४ धावा करून दोन विकेट घेतल्या.

कोलकात्याने हैदराबादला २०९ धावांचे लक्ष्य दिले होते. त्याचा पाठलाग करताना पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादचा संघ अवघ्या २०४ धावा करू शकला. हेन्रिक क्लासेनने २९ चेंडूंत ६३ धावा केल्या.हेन्रीच क्लासेन आणि शाहबाझ अहमद यांनी शेवटच्या तीन षटकांत कमाल केली. हैदराबादला शेवटच्या तीन षटकांत ६० धावा हव्या होत्या. हेन्रीच याने कोलकात्याची गोलंदाजांची पिसे काढली. मिचेल स्टार्कच्या चार षटकांत ५३ धावा कुटल्या गेल्या.

हे ही वाचा :

केजरीवालांच्या अटकेवर टिपण्णी करणाऱ्या जर्मनीला भारताने सुनावले खडेबोल

स्वातंत्र्यवीर ‘सावरकर’ बॉक्स ऑफिसवर हिट

भारत- भूतानमध्ये व्यापार, डिजिटल कनेक्टिव्हिटी, अंतराळ क्षेत्रातले सामंजस्य करार

टीएमसीच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या संबंधित ठिकाणांवर सीबीआयकडून धाडसत्र

त्याला एकही विकेट मिळू शकली नाही. हेन्रीच याने त्याच्या एका षटकात २६ धावा केल्या. त्यामुळे हैदराबादला विजयासाठी सहा चेंडूंत १३ धावांची आवश्यकता होती. त्यानंतर दिल्लीचा २२ वर्षांचा जलदगती गोलंदाज हर्षित राणा याने शेवटचे षटक टाकले आणि क्लासन आणि शहाबाज यांच्या दोन महत्त्वाच्या विकेट घेऊन विजयावर शिक्कामोर्तब केले.
हेन्रीच क्लासेन याने सहा षटके ठोकली.

हैदराबादची अवस्था पाच बाद १४९ अशी झाली असताना १७व्या षटकांत धावसंख्या २०९वर पोहोचली होती. क्लासन याने वरुण चक्रवर्तीच्या १८व्या षटकांत २१ धावा कुटल्या. तर, मिचेल स्टार्कच्या १९ व्या षटकांत २६ धावा कुटल्या गेल्या.
कोलकात्याची फलंदाजीही तितकीशी प्रभावी ठरली नाही. कोलकात्याची तीन बाद ३२ अशी अवस्था होती जी चार बाद ५१ झाली. सुनील नारायण याला सलामीला पाठवण्याची खेळी चुकली. तो दोन धावा करून धावचित झाला. व्यंकटेश अय्यर सात धावांवर बाद झाला. रसेल आणि रिंकू सिंग यांनी ८१ धावांची भागिदारी केली. त्यामुळे शेवटच्या पाच षटकांत ७५ धावा होऊ शकल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
146,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा