28 C
Mumbai
Friday, November 1, 2024
घरविशेषभाजपने वरुण गांधी यांचे नाव वगळले; आई मनेका गांधी यांची जागा कायम!

भाजपने वरुण गांधी यांचे नाव वगळले; आई मनेका गांधी यांची जागा कायम!

वरुण गांधींच्या जागी जितिन प्रसाद यांना संधी

Google News Follow

Related

भाजपने पिलभित लोकसभा मतदारसंघातून वरुण गांधी यांचे नाव वगळले आहे. या जागेवरून सन २०२१ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले जितिन प्रसाद यांना तिकीट दिले आहे. तर, गांधी यांच्या मातोश्री मनेका गांधी यांचा उत्तर प्रदेशमधील सुल्तानपूर हा मतदारसंघ कायम ठेवला आहे.

वरुण गांधी यांनी सातत्याने भाजपच्या केंद्रातील आणि उत्तर प्रदेशमधील सरकारवर सातत्याने टीका केली आहे. गेल्या वर्षी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीका केली होती. ‘जवळून जाणाऱ्या कोणत्याही साधूला त्रास देऊ नका, काय माहीत महाराजची कधीपण मुख्यमंत्री होतील,’ अशी टीका त्यांनी केली होती.सप्टेंबर २०२३मध्ये अमेठीतील संजय गांधी रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्या रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात आला होता. तेव्हादेखील त्यांनी उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारवर टीका केली होती.

सन २०२१मध्ये लखीमपूर खेरी हिंसाचाराप्रकरणी जबाबदारी निश्चित करून दोषींना कठोर शासन करण्याची मागणी गांधी यांनी केली होती. त्यानंतर त्यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आले होते.काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांचे चुलतभाऊ आणि काँग्रेसनेते राहुल गांधी यांची केदारनाथ मंदिरातही भेट घेतली होती. त्यावेळी ते कदाचित काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. वरुण गांधी यांच्या या वर्तनामुळे त्यांना यावेळी भाजपकडून लोकसभेचे तिकीट दिले जाणार नाही, अशा चर्चा सुरू होत्या. त्यामुळे त्यांनी अपक्ष लढण्याची तयारी दर्शवल्याचे समजते.

हे ही वाचा:

अरविंद केजरीवाल यांना जनपाठिंबा दाखवण्यासाठी वापरले जगन्नाथ पुरीमधील जुन्या रथयात्रेचे छायाचित्र

अभिनेत्री कंगना रणौत, अरुण गोविल भाजपच्या पाचव्या यादीत!

नरेंद्र मोदींना मत द्या हीच लग्नाची भेट; तेलंगणातील लग्नपत्रिका व्हायरल

तुरुंगातून केजरीवालांनी दिलेला आदेश चौकशीच्या फेऱ्यात

वरुण गांधी यांच्या प्रतिनिधींनी दिल्लीत येऊन पिलभित मतदारसंघाचे उमेदवारी अर्जांचा चार सेट आणल्याचे समजते. तसेच, ते समाजवादी पक्षासह अन्य पक्षांच्याही संपर्कात अस्याचे समजते.एकेकाळचे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जितीन प्रसाद यांनी ते दुर्लक्षित झाल्याचे सांगून काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबतच लोकसभेची निवडणूक लढवली होती. राहुल गांधी अमेठीची जागा जिंकली होती तर, जितिन प्रसाद शाहजहाँपूरमधून जिंकले होते. या जागेवरून त्यांच्या वडिलांनी चारवेळा निवडणूक जिंकली आहे.

मनमोहन सिंग यांच्या सन २००८च्या सरकारमध्ये ते सर्वांत तरुण मंत्री होते. सन २००९मध्ये त्यांनी धरौरा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती आणि त्यांनी मनमोहन सिंग सरकारमध्ये विविध मंत्रालयांचा कारभार बघितला होता. पक्षसंघटनेत मूलगामी बदल होणे अपेक्षित आहे, अशी मागणी करणाऱ्या जी-२३ गटामध्येही त्यांचा समावेश होता.सन २०१७मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत गांधी कुटुंबीयांनी समाजवादी पक्षाशी युती करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचे सांगितले जाते. अर्थात नंतर काँग्रेसने नंतर एकट्यानेच ही निवडणूक लढवली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा