28.7 C
Mumbai
Thursday, October 29, 2026
घरदेश दुनियादिल्लीत लॉकडाउनआधी तळीरामांची गर्दी

दिल्लीत लॉकडाउनआधी तळीरामांची गर्दी

Google News Follow

दिल्लीमध्ये सात दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीत दारूच्या दुकानासमोर लांबच लांब रांग पहायला मिळाली आहे. त्यामुळे कोरोना सोशल डिस्टन्सिंगचा मात्र पुरता फज्जा उडालेला पहायला मिळाला.

सोमवारी म्हणजेच आज रात्री १० वाजल्यापासून पुढच्या सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत म्हणजेच (२६ एप्रिलपर्यंत) हा लॉकडाऊन लागू असेल. या नियमांअंतर्गत अत्यावश्यक सेवा, अन्नपुरवठा, वैद्यकिय सेवा सुरुच राहणार आहेत. तर, लग्नसोहळ्यांमध्ये ५० उपस्थितांचा आकडा बंधनकारक असेल, अशी माहिती शासनातर्फे देण्यात आली. त्यामुळे दारूच्या दुकानांसमोर तळीरामांनी गर्दी केलेली पहायला मिळाली आहे.

हे ही वाचा:

कुडमुड्या गोखले गँगचा गलका

साकेत गोखले यांच्यावर गुन्हा दाखल

ट्वीटरवर गाजला ‘अरेस्ट साकेत गोखले’ ट्रेंड

ठाकरे सरकार या प्रश्नांची उत्तरे देणार का?

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी बिघडलेली असतानाच दिल्लीमध्ये आज रात्रीपासून पुढच्या सोमवारपर्यंत सक्तीचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भातील माहिती देत खासगी आस्थापनांना वर्क फ्रॉम होमचे निर्देश दिले आहेत.

पुढील सहा दिवसांमध्ये लॉकडाऊन काळात, दिल्लीमध्ये बेड्सची व्यवस्था करण्यात येणार आहे, असं म्हणत केजरीवाल यांनी आपल्याला केलेल्या सहकार्यासाठी केंद्राचे आभारही मानले. लॉकडाऊनच्या या काळात निर्बंध लागू असताना ऑक्सिजन, औषधं अशा सुविधा मार्गी लावण्यासाठीची पावलं उचलण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय त्यांनी नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं.

रविवारी दिल्लीमध्ये कोविडचे सर्वाधिक म्हणजेच, २५,४६२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. या भागात संसर्गाचं प्रमाण वाढीस लागलं असून, त्याची सरासरी २९.७४ वर पोहोचली आहे. याचाच अर्थ असा, की चाचणीचा दर तिसरा नमुना पॉझिटीव्ह असल्याचं आढळून येत आहे. मागील २४ तासांत दिल्लीमध्ये १६१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा