23 C
Mumbai
Thursday, December 25, 2025
घरविशेषरेणुकास्वामी हत्येचा बेंगळुरू पोलिसांनी असा लावला छडा!

रेणुकास्वामी हत्येचा बेंगळुरू पोलिसांनी असा लावला छडा!

आरोपी अभिनेत्यासह सर्वांना २० जूनपर्यंत पोलीस कोठडी

Google News Follow

Related

बेंगळुरूच्या तीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी समन्वयाने केलेल्या तपासमोहिमेमुळे रेणुकास्वामी हत्याप्रकरणाचा छडा लावण्यात यश आले अन् कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा याला तत्परतेने अटक करण्यात आली.रेणुकास्वामी या ३३ वर्षीय रिक्षाचालकाचा मृतदेह ९ जून रोजी बेंगळुरूमधील उड्डाणपुलाजवळ आढळून आला आणि दोन दिवसांतच म्हणजे ११ जून रोजी कर्नाटक पोलिसांनी अभिनेता दर्शनला अटक केली. दर्शनने सांगितल्यानुसार, एका टोळीने रेणुकास्वामी याचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.

बेंगळुरूचे पोलिस आयुक्त बी. दयानंद यांनी वैयक्तिकरीत्या या संपूर्ण तपासावर लक्ष दिले होते. बेंगळुरू पश्चिम विभागाचे उपायुक्त (डीसीपी) एस गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या तपासात मोठे यश मिळाले. सहायक आयुक्त चंदन कुमार यांनी अभिनेता दर्शन याला अटक केली.एस गिरीश यांच्या तपासातच दर्शनचा हत्येशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले. त्याने त्वरित पोलिसांना शरण आलेल्या तीन जणांच्या जबाबात असलेली विसंगती ओळखली आणि हत्येत त्यांचा सहभाग असल्याचे त्यांच्याकडून कबूल करून घेतले.

२०० किलोमीटर दूर राहात असलेल्या चित्रदुर्गातील या रिक्षाचालकाची बेंगळुरूतील चार जणांनी हत्या का केली, हे मूळ कोडेच होते. उपायुक्त गिरीश यांनी याचा बारकाईने तपास केला. त्यांनी बेंगळुरूच्या आरआर नगरमधील रेस्टॉरंट मालक विनय व्ही याच्याकडे चौकशी केली.विनय याने माहिती दिली की, रेणुकास्वामीने त्याच्या सोशल मीडियावर दर्शनची पत्नी, अभिनेत्री पवित्रा गौडा हिच्याबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे दर्शन संतापला होता आणि दर्शनच्या सांगण्यावरूनच रेणुकास्वामी याचा छळ करण्यात आला होता. पुढील तपासात गुन्ह्याच्या ठिकाणाजवळ दर्शनशी संबंधित वाहनाचा सहभाग असल्याचे सीसीटीव्ही फुटेज सापडले.

या हत्येत दर्शनचा सहभाग असल्याचे निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करण्याचा निर्णय घेतला. विजयनगरचे सहाय्यक पोलिस आयुक्त चंदन कुमार यांच्यावर म्हैसूरमध्ये दर्शनला अटक करण्याचे काम सोपवण्यात आले होते.
दर्शन ज्या म्हैसूरच्या हॉटेलमध्ये थांबला होता, तिथे ११ जूनच्या पहाटे चंदन पोहोचले. दर्शनने स्वतःच्या वाहनाने प्रवास करण्याचा आग्रह धरला होता. मात्र चंदन यांनी त्याची ही विनंती नाकारली आणि त्याला जबरदस्तीने पोलिसांच्या वाहनात बसवले.

हे ही वाचा..

‘डीपफेक’ तंत्रज्ञानाला आळा घालण्यासाठी सरकार डिजिटल इंडिया विधेयक आणणार!

‘दिल्लीच्या जलसंकटावर आतिशी खोटे बोलत आहेत’

दहशतवादविरोधी कारवाया तीव्र होणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली बैठक

पंतप्रधान मोदींनी ‘ग्लोबल साऊथ’चे नेते म्हणून भारताची प्रतिमा केली मजबूत

चंदन यांनी दर्शनला ठणकावले, ‘तू आरोपी आहेस. तुझ्याकडे पर्याय नाही. एकतर तू पोलिसांच्या गाडीत ये, नाहीतर तुझी कॉलर धरून तुला आत ढकलायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही. निमूटपणे गाडीत बस.’राजकीय वर्तुळातील प्रतिष्ठित व्यक्ती, प्रभावशाली व्यक्ती आणि दर्शनच्या चाहत्यांकडून अभिनेत्याबाबत नरमाईची भूमिका घेण्यासाठी दबाव आणला जात आहे. मात्र, आयुक्त बी. दयानंद यांनीही तपासाची सूत्रे हाती घेतल्याने हा दबाव वाढला नाही. त्यांनी गिरीश आणि कुमार यांना तपासादरम्यान मार्गदर्शन केले आणि खटला नीट आहे ना, याची खात्री करण्यासाठी पुराव्याची वैयक्तिक तपासणी केली.

पोलिसांच्या पथकाने मोबाइल टॉवर लोकेशन्स आणि कॉल रेकॉर्डिंगसह तांत्रिक डेटाचेही विश्लेषण केले.
रेणुकास्वामी याने सोशल मीडियावर पवित्रा गौडा हिच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचे तपासात समोर आले असून, दर्शन आणि त्याच्या पत्नीमध्ये मतभेद निर्माण झाल्याचा आरोप त्याने केला होता.चित्रदुर्गातील दर्शनच्या फॅन क्लबचा सदस्य असलेल्या राघवेंद्र या आरोपींपैकी एकाने दर्शनच्या भेटीच्या बहाण्याने रेणुकास्वामी याला आरआर नगर येथील एका शेडमध्ये नेले.

येथेच रेणुकास्वामी याचा छळ करून त्यांची हत्या करण्यात आली होती. दर्शननेच त्याच्यावर हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे.या हत्येप्रकरणी दर्शन, पवित्रा गौडा आणि त्यांच्या १२ साथीदारांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी बेंगळुरू न्यायालयाने अभिनेत्री पवित्रा आणि इतरांच्या पोलिस कोठडीत २० जूनपर्यंत आणखी पाच दिवसांची वाढ केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा