31 C
Mumbai
Sunday, December 14, 2025
घरदेश दुनियाउष्णतेमुळे ५७७ हज यात्रेकरूंचा मृत्यू; ५१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

उष्णतेमुळे ५७७ हज यात्रेकरूंचा मृत्यू; ५१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

मृतांमध्ये ३२३ इजिप्तमधील यात्रेकरूंचा समावेश

Google News Follow

Related

वाढत्या तापमानाचा फटका हज यात्रेकरुंना बसलेला आहे. सौदी अरेबियातील मक्का येथे हजसाठी आलेल्या ५५० हून अधिक यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. १२ जून ते १९ जून या कालावधीत चाललेल्या हज यात्रेत आतापर्यंत एकूण ५७७ यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. याचे कारण सौदी अरेबियातील कडक उष्मा असल्याचे सांगितले जात आहे.

जगभरात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसून येत आहे. आखाती देश सौदी अरेबियामध्ये बिकट अवस्था असून उष्णतेने ५७७ यात्रेकरूंचा बळी घेतला आहे. अति उष्णतेमुळे ५७७ हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचे सौदी सरकारने सांगितले आहे. मृत हज यात्रेकरूंमध्ये सर्वाधिक ३२३ इजिप्तमधील यात्रेकरूंचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी एएफपीला सांगितले. मृत हज यात्रेकरूंमध्ये अनेक देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. जॉर्डनमधील सुमारे ६० हज यात्रेकरूंचा देखील मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी, हज यात्रे दरम्यान, सुमारे २४० यात्रेकरू उष्णतेमुळे मरण पावले होते. यात बहुतेक इंडोनेशियन होते. सौदी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेमुळे आजारी पडलेल्या सुमारे दोन हजार हज यात्रेकरूंवर उपचार सुरू आहेत.

इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मंगळवारी सांगितले की ते सौदी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने बेपत्ता शोधण्यासाठी ऑपरेशन करत आहेत. १७ जून रोजी मक्काच्या ग्रँड मशिदीमध्ये तापमान ५१.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मक्कामध्ये हवामान बदलाचा खोलवर परिणाम होत आहे. येथील सरासरी तापमान दर १० वर्षांनी ०.४ अंश सेल्सिअसने वाढत आहे.

हे ही वाचा..

पावो नूरमी स्पर्धेत नीरज चोप्राला सुवर्णपदक

सुंजवान आर्मी कॅम्प दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड अमीर हमजाची पाकिस्तानात हत्या

भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाची लवकरच घोषणा

‘मोदीजी धमक्यांना घाबरणार नाहीत’

या वर्षी सुमारे १८ लाख यात्रेकरू हजसाठी दाखल झाले आहेत. यापैकी १६ लाख लोक इतर देशांतील आहेत. दरवर्षी हजारो यात्रेकरू हजला जातात, ज्यांच्याकडे व्हिसा असतो. तर, काही लोक पैशाअभावी चुकीच्या मार्गाने मक्का गाठतात. सौदी राजनयिकांनी न्यूज एजन्सी एएफपीला सांगितले की मृत्यू झालेल्यांमध्ये इजिप्शियन यात्रेकरूंची संख्या जास्त आहे कारण त्यांच्यापैकी अनेकांनी हजसाठी नोंदणी केली नव्हती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा