28 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरविशेषओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली अनेक देशहिताची विधेयके झाली संमत!

ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली अनेक देशहिताची विधेयके झाली संमत!

पंतप्रधान मोदींकडून ओम बिर्ला यांचे कौतुक

Google News Follow

१८ व्या लोकसभा अध्यक्षपदी भाजपचे ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. आवाजी मतदानाच्या आधारे ओम बिर्ला यांनी ही निवडणूक जिंकत काँग्रेसच्या के सुरेश यांचा पराभव केला. लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची ही सलग दुसरी टर्म आहे. ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी संसदेला संबोधित करत ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मला सभागृहाच्या वतीने तुमचे अभिनंदन करायचे आहे. अमृत ​​कालमध्ये दुसऱ्यांदा हे पद मिळविणे ही तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. आम्हाला आशा आहे की तुम्ही आम्हाला तुमच्या पुढील पाच वर्षांच्या अनुभवाने मार्गदर्शन कराल.

ओम बिर्ला यांचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘तुमच्या चेहऱ्यावरचे हे गोड हास्य संपूर्ण सभागृहाला आनंदी ठेवते. दुसऱ्यांदा अध्यक्ष होणे हा एक विक्रम आहे. तुमच्या आधी बलराम जाखड यांना सलग दोन वेळा लोकसभा अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली होती आणि त्यानंतर तुम्हाला ही संधी मिळत आहे.

हे ही वाचा:

ओम बिर्ला नवे लोकसभा अध्यक्ष!

क्रिकेटमधील DLS पद्धतीचे निर्माते फ्रँक डकवर्थ यांचे निधन

दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांना सीबीआयकडून अटक

पॅलेस्टाईन समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या असदुद्दीन ओवेसींची खासदारकी रद्द करण्याची मागणी

खासदार म्हणून तुमची काम करण्याची पद्धत देखील जाणून घेण्यासारखी आहे आणि बरेच काही शिकण्यासारखे आहे. मला विश्वास आहे की खासदार म्हणून तुमची कार्यशैली आमच्या खासदारांना, तरुण खासदारांना नक्कीच प्रेरणा देईल. १७ वी लोकसभा हा संसदीय इतिहासाचा सुवर्णकाळ राहिला आहे. या कार्यकाळात तुमच्या अध्यक्षतेखाली अनेक देशहिताचे विधेयक पास झालेत.

ज्यामध्ये नारी शक्ती अधिनियम २०२३, जम्मू काश्मीर पुनर्गठन विधेयक, भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता, डिजिटल पर्सनल डेटा प्रॉटेक्शन बिल, मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक, एलजीबीटीक्यू बिल, सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय महत्वीय अशी कित्येक विधेयके तुमच्या कार्यकाळात पास झाले आहेत. तसेच ओम बिर्ला यांनी सुरु केलेल्या हेल्दी चाइल्ड, हेल्दी मदर अभियानाचेही पंतप्रधान मोदींनी कौतुक केले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, कोरोनाच्या काळात तुम्ही प्रत्येक खासदाराच्या तब्येतीची विचारपूस केली, कोणी आजारी पडले असेल तर त्याची वैक्तिकरित्या चौकशी केली. तुम्ही घेतलेल्या निर्णयांमुळे त्या कठीण काळातही आम्ही काम करू शकलो, असे सांगत पंतप्रधान मोदींनी ओम बिर्ला यांचे कौतुक केले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा