25 C
Mumbai
Monday, July 22, 2024
घरविशेषक्रिकेटमधील DLS पद्धतीचे निर्माते फ्रँक डकवर्थ यांचे निधन

क्रिकेटमधील DLS पद्धतीचे निर्माते फ्रँक डकवर्थ यांचे निधन

वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Google News Follow

Related

क्रिकेटमधील डकवर्थ लुईस पद्धतीचे निर्माते आणि इंग्रजी सांख्यिकीशास्त्रज्ञ फ्रँक डकवर्थ यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. डकवर्थ यांनी २१ जून रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. डकवर्थ यांनी त्यांचे सहकारी सांख्यिकीशास्त्रज्ञ टोनी लुईस यांच्यासोबत DLS ही पद्धत विकसित केली होती. हा नियम आजही पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यांसाठी क्रिकेटमध्ये वापरला जातो. डकवर्थ यांचे साथीदार लुईस यांचे २०२० मध्ये वयाच्या ७८ वर्षी निधन झाले होते.

DLS पद्धत १९९७ मध्ये प्रथमच क्रिकेट सामन्यात लागू करण्यात आली. पुढे २०११ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने म्हणजेच आयसीसीने ही पद्धत मान्य करत आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरण्यास सुरुवात केली. फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस यांच्या निवृत्तीनंतर स्टीव्हन स्टर्न या ऑस्ट्रेलियन सांख्यिकीतज्ज्ञाने या पद्धतीत काही सुधारणा केल्या. या कारणास्तव या नियमाला डकवर्थ-लुईस-स्टर्न असे नाव देण्यात आले.

डकवर्थ-लुईस हा नियम पावसामुळे किंवा हवामानामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यांमध्ये वापरला जातो. वेळ वाचवण्यासाठी षटक कमी केले जातात, म्हणून अनेक DLS नियम लागू करताना अनेक पैलू विचारात घेतले जातात. जसे एखाद्या संघासाठी किती विकेट्स शिल्लक आहेत, किती षटके झाली आणि इतर अनेक पैलू देखील विचारात घेतले जातात.

हे ही वाचा:

पॅलेस्टाईन समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या असदुद्दीन ओवेसींची खासदारकी रद्द करण्याची मागणी

रेल्वेसंबंधी व्हायरल व्हिडीओ दिशाभूल करणारे

पवार, ठाकरे, जरांगेंचे गलिच्छ राजकारण चालू देणार नाही!

गावबंदीची उठाठेव कशाला? ओबीसींचे आंदोलन ‘जरांगे’ मार्गाने जायला नको…

फ्रँक डकवर्थ यांनी १९६१ मध्ये लिव्हरपूल विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पुढील शिक्षण घेतले. फ्रँक यांनी १९६५ मध्ये धातुशास्त्रात पीएचडी पदवीही प्राप्त केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेसाठी सल्लागार सांख्यिकीशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले आणि फ्रँक २०१४ मध्ये निवृत्त झाले. ११९७ मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये DLS नियम वापरण्यात आला, त्यानंतर २००१ मध्ये ICC ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा नियम पूर्णपणे लागू करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन सांख्यिकीशास्त्रज्ञ स्टीव्हन स्ट्रेन यांनी डकवर्थ आणि लुईसच्या या नियमात किंचित सुधारणा केल्यावर २०१४ मध्ये या नियमाचे नाव देखील बदलण्यात आले. डकवर्थ आणि लुईस यांच्या निवृत्तीनंतर या पद्धतीचे नाव बदलून डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धत असे ठेवण्यात आले, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन सांख्यिकीशास्त्रज्ञ स्टीव्हन स्टर्न यांनी काही बदल केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
166,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा