28 C
Mumbai
Thursday, November 7, 2024
घरक्राईमनामासंजू बनलेल्या सलीमने हिंदू प्रेमिकेची हत्या करत सहा फूट जमिनीत गाडले!

संजू बनलेल्या सलीमने हिंदू प्रेमिकेची हत्या करत सहा फूट जमिनीत गाडले!

दिल्ली पोलिसांनी केली अटक

Google News Follow

Related

दिल्ली पोलिसांना २१ ऑक्टोबरला २० वर्षीय मुलगी सोनियाचा मृतदेह सापडला. दिल्लीतील नांगलोई भागात ही मुलगी राहत होती. तिची हत्या सलीम नावाच्या मुलाने केल्याचे आता समोर आले आहे. संजू या नावाने त्याने या मुलीची फसवणूक केली आणि नंतर तिची हत्या केल्याचा आरोप आहे. लव्ह जिहादच्या या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

या तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यातून ती गरोदर राहिली. जेव्हा तिने सलीमला लग्न करण्यास सांगितले तेव्हा त्याने तिला भेटायला बोलावले आणि तिची आपल्या दोन मित्रांच्या साथीने हत्या केली.

२० ऑक्टोबरला ही मुलगी हरवली असल्याची तक्रार केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. त्या मुलीच्या घरच्यांनी तक्रार नोंदविली. या मुलीच्या हत्येमागे सदर संजू नावाचा मुलगा असल्याचा संशयही व्यक्त केला गेला. या संजू तथा सलीमने या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह एकेठिकाणी सहा फूट जमिनीत गाडला होता.

शेवटी पोलिसांनी सलीमला अटक केली. त्याने ही कबुली दिली की, त्याने हिंदू नाव धारण करून त्या मुलीशी ओळख करून घेतली. काही महिने हे दोघेही एकमेकांना ओळखत होते. या मुलीने या मुलाचा नंबरही सेव्ह केलेला होता. त्याचे नाव ‘भूत’ असे सेव्ह केले होते. या मुलीला इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकण्याची सवय होती. त्यावेळी तिने आय लव्ह भूत असे म्हटल्याचे समोर येते आहे. त्यानंतर तिच्या कुटुंबियांना हे कळले की, ती संजू नावाच्या मुलासोबत बोलते आहे. तिला त्यांनी सावधही केले पण आपण त्या मुलाच्या प्रेमात पडले असल्याचे त्या मुलीकडून सांगण्यात येत होते. तिच्या भावंडांनीही तिला सावध केले पण तरीही ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. शेवटी तिने या मुलाशी संबंध सुरूच ठेवले. त्यातून ती गरोदर राहिली. त्यानंतर तिने सलीमला लग्न करण्याची मागणी केली. तेव्हा त्याने २० ऑक्टोबरला आपण लग्न करू असे सांगितले. करवा चौथच्या निमित्ताने आपण लग्नगाठ बांधू असे तो म्हणाला होता. त्यादिवशी त्याने तिला उपास करण्यासही सांगितले. त्या रात्री तिने उपास सोडण्यासाठी भेटण्यासही त्याने बोलावले. २० तारखेला ती घराबाहेर पडली पण कधीही घरी परतली नाही.

हे ही वाचा:

भगव्या ध्वजाला नमन करत अतुल भातखळकरांच्या प्रचाराला प्रारंभ!

फटाके फोडण्यावरून भिलवाडामध्ये हिंसाचार

फरार झालेल्या काँग्रेस महिला नेत्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट

ठाकरे गटानंतर काँग्रेसचीही दुसरी यादी जाहीर; एकूण ७१ जागांवर दिले उमेदवार

एका कारमधून या मुलीला सलीमने नेले. त्याच्यासोबत रितिक आणि पंकज या नावाची दोन मुलेही होती. त्यानंतर त्याने मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह रोहतक येथे नेला आणि तो दफन केला.

सदर मुलीच्या पालकांना संजू नावाच्या मुलावर संशय आला. त्यांनी त्याचा पत्ता शोधला. तेव्हा तो मूळचा मुस्लिम असल्याचे लक्षात आले आणि त्यांना धक्का बसला. त्यानंतर पोलिसांनी शोध घेत सलीमला अटक केली. त्याच्यासोबत असलेल्या दोन युवकांनाही अटक करण्यात आली.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
188,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा