28.8 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरराजकारणज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन

ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन

Google News Follow

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं निधन झालं. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकनाथ गायकवाड हे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते.

एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी १०.०० वाजता कोरोनामुळे त्यांचं  निधन झाले. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते. एकनाथ गायकवाड यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार होतील, अशी माहिती आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारचे माथाडी कामगारांकडे पूर्ण दुर्लक्ष- नरेंद्र पाटील

इस्राएलनंतर आता अमेरिकाही मास्क मुक्तीकडे?

मुंब्र्यातील रुग्णालयाला आग

आसामला भूकंपाचा धक्का

एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष होते. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविलं होतं. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती. साधी राहणीमान असलेले गायकवाड विक्रोळीत राहत होते. मात्र, त्यांनी धारावीवर आपली पकड ठेवली होती. धारावीतील प्रत्येक चाळीतील लोकांना ते नावाने ओळखत होते. गायकवाड हे काँग्रेसमधील असले तरी दलित चळवळीशी त्यांचं सख्य होतं. दलित चळवळीतील कार्यकर्तेही त्यांना मानत होते. सर्वच रिपब्लिकन नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरहिरीने भाग घेत होते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा