31 C
Mumbai
Wednesday, May 15, 2024
घरदेश दुनियाइस्राएलनंतर आता अमेरिकाही मास्क मुक्तीकडे?

इस्राएलनंतर आता अमेरिकाही मास्क मुक्तीकडे?

Google News Follow

Related

संपूर्ण जगभर कोरोनाच्या संकटाला सामोरे जात आहे. या संकटावर मात कशी करायची, असा यक्षप्रश्न जगापुढे असताना अमेरिकेनेही मास्कमुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. देशात कोरोना लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली आहे. ज्या लोकांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे, तसेच ज्या लोकांपासून इतरांना संसर्गाचा धोका आहे, अशा लोकांसाठी अमेरिकेत प्राधान्याने कोरोना लसीकरण पूर्णत्वास नेले जात आहे. विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या नागरिकांची लसीकरण मोहिमेत विशेष खबरदारी घेतली जात आहे. या मोहिमेला चांगले यश मिळू लागल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आता लस टोचून घेतलेल्या नागरिकांना घराबाहेर मास्कशिवाय फिरण्यास मुभा दिली आहे.

ज्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, त्या नागरिकांना मोठ्या गर्दीची ठिकाणे वगळता इतरत्र तोंडाला मास्क लावण्याची गरज नसेल. ज्या नागरिकांनी कोरोना लस टोचून घेतली नसेल ते नागरिकही काही परिस्थिती वगळता मास्कशिवाय बाहेर जाऊ शकतात. अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राकडून आज हा महत्त्वपूर्ण खुलासा करण्यात आला आहे. मागील वर्षभर कोरोना संसर्गामुळे नागरिकांना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक झाले आहे. आता लसीकरणामुळे कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात येण्याची चिन्हे आहेत. त्यात मास्कशिवाय फिरण्यास मुभा मिळाल्याने अमेरिकेच्या नागरिकांनी समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोरोना महामारीमुळे विस्कळीत झालेली जनजीवनाची घडी हळूहळू पूर्वपदावर येण्याची आशा पल्लवित झाली आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना विषाणूने ५ लाख ७० हजार लोकांचा बळी घेतला आहे.

अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राने (सीडीसी) गेल्या वर्षी कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलली होती. अमेरिकन नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क बंधनकारक करण्यात आला होता. तसेच एकमेकांपासून सहा फुटांचे शारिरीक अंतर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता. आता कोरोना लसीकरणानंतर सीडीसीने आपल्या भूमिकेत बदल केला आहे. सध्याच्या घडीला अमेरिकेत निम्म्याहून अधिक वयस्कर लोकांनी कोरोनाचा किमान एक डोस घेतला आहे. तसेच एक तृतीयांशहून अधिक जनतेने कोविड प्रतिबंधक लसीचे पूर्ण डोस घेतले आहेत. बर्मिंघमच्या अलबामा विद्यापीठातील संसर्गरोग विशेषज्ञ डॉ. माइक साग यांनी रोग नियंत्रण केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले. हा निर्णय म्हणजे स्वातंत्र्याची वापसी आहे. हे सामान्य जनजीवनाकडे टाकलेले पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. साग यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

मुंब्र्यातील रुग्णालयाला आग

आसामला भूकंपाचा धक्का

सेहवाग देतोय कोविड रुग्णांना मोफत जेवण

नियम मोडणाऱ्या फेरीवाल्यांची वॉर्ड ऑफिसरला मारहाण

जगात सर्वात आधी मास्कमुक्त देश बनण्याचा मान इस्राएलने मिळवला आहे. इस्राएलच्या आरोग्य प्रशासनाने आठवडाभरापूर्वी मास्कमुक्तीची घोषणा केली होती. तेथेही कोरोना लसीकरणाला प्रचंड गती देण्यात आली. अपेक्षित लसीकरण पूर्ण झाल्यानंतर सरकारने नागरिकांना मास्कशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास परवानगी दिली आहे.

यामुळे भारतातही लसीकरण पूर्ण झाल्यावर मास्कपासून मुक्ती मिळू शकते अशी आशा उत्पन्न झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा