31 C
Mumbai
Monday, May 27, 2024
घरविशेषमुंबईत हजार पेक्षा अधिक होर्डिंग अनधिकृत!

मुंबईत हजार पेक्षा अधिक होर्डिंग अनधिकृत!

महापालिकेला आली जाग, कारवाई सुरू

Google News Follow

Related

मुंबईत काल(१३ मे) अवकाळी पावसाच्या वादळामुळे घाटकोपरमध्ये होर्डिंग्ज कोसळल्यानंतर मुंबई महानगरपालिकेला जाग आली आहे.मुंबईतील अनधिकृत असलेले होर्डिंग्ज मुंबई महापालिकेकडून काढण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात १४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.तर अनेक जण जखमी झाले आहेत.

मुंबईतल्या घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेत १४ लोकांचा बळी गेला.या घटनेनंतर महापालिका खडबडून जागी झाली असून मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्यास सुरुवात झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत जवळपास हजारहून अधिक होर्डिंग्ज अनधिकृत आहेत.संबंधितांना नोटीस पाठवण्यात येणार असून स्ट्रक्चरल ऑडिट करून १० दिवसांच्या आत त्याचा अहवाल पाठवण्याचे आदेश महापालिकेकडून देण्यात आले आहेत.तसेच १८० होर्डिंग्ज रेल्वेच्या जागेत असून त्यांनाही नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.बेकादेशीर परवानगी नसलेल्या होर्डिंग्सवर कारवाई होणार असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

होर्डिंगकिंग भावेश भिंडेवर बलात्काराच्या गुन्ह्यासह २१ गुन्हे

मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे म्हणून मुस्लिम समुदायाने दर्ग्यावर चढवली चादर!

बुडत्या उबाठाला योगेंद्र आधार

दिल्ली: प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी चोरट्याचा २०० वेळा विमान प्रवास!

घाटकोपर पूर्व येथे सोमवारी झालेल्या होर्डिंग दुर्घटनेत १४ जणांचा बळी गेला.या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात होर्डिंग कंपनी एगो मीडियाचे मालक, संचालक, अधिकारी कर्मचारी यांच्यासह सिव्हिल कंत्राटदार यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एगो मीडिया कंपनीचा मालक भावेश भिंडे हा सध्या फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
156,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा