28.7 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरविशेषबिश्नोईला आव्हान देणारा पप्पू यादव थरथर कापू लागला!

बिश्नोईला आव्हान देणारा पप्पू यादव थरथर कापू लागला!

सलमान प्रकरणापासून दूर राहण्याची आली धमकी

Google News Follow

बिहारचे खासदार पप्पू यादव यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एका ऑडिओ क्लिपमध्ये, कॉलरने दावा केला आहे की, तो खासदाराच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवून आहे आणि जर अभिनेता सलमान खानच्या संबंधित प्रकरणांपासून दूर राहिला नाही तर त्याला ठार मारण्यात येईल.

कॉलरने म्हटले की, खासदाराच्या सर्व ठिकाणांची माहिती माझ्या भावाकडे आहे. तसेच तुरुंगात असताना सिग्नल जॅमर लावून व्हिडीओ कॉलही केला होता, मात्र उचलला नाही. हे चुकीचे केले. याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी खासदार पप्पू यादव यांना मिळाली आहे.

अलीकडेच, लॉरेन्स बिश्नोई टोळीने मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येचा दावा केला. बाबा सिद्दीकिंच्या हत्येनंतर, पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी बिश्नोई यांना खुले आव्हान दिले होते.कायद्याने परवानगी दिली तर २४ तासांत या दोन टक्का गुन्हेगाराचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करेन, असे म्हटले होते. या घटनेनंतर तब्बल १३ दिवसांनी पप्पू यादवला जीवे मारण्याची धमकी आली आहे. दरम्यान, या प्रकरणी खासदार पप्पू यादव यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हे ही वाचा : 

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशांच्या घरी कार्यक्रमात भाग घ्यायला हरकत नाही!

ऑस्ट्रेलियात दोन हिंदू मंदिरांची तोडफोड

भारताच्या चिराग चिक्काराची सुवर्णझेप, ठरला दुसरा कुस्तीपटू!

संजय राऊत, नाना पटोलेंमध्ये जुंपली; राऊत म्हणतात, यादीत काँग्रेसची टायपिंग मिस्टेक

 

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा