26 C
Mumbai
Wednesday, December 17, 2025
घरविशेषचालत्या गाडीत बलात्काराला विरोध केल्याने ब्युटीशियनची हत्या!

चालत्या गाडीत बलात्काराला विरोध केल्याने ब्युटीशियनची हत्या!

लखनौ पोलिसांकडून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका २६ वर्षीय ब्युटीशियनवर चालत्या कारमध्ये बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि तिने प्रतिकार केल्यावर आरोपीने तिच्यावर चाकूने वार करून हत्या केली. पोलिसांनी विकास आणि आदर्श नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे, तर तिसरा आणि मुख्य आरोपी अजय अजूनही फरार आहे. त्याच्या शोधात पोलिस विविध ठिकाणी छापे टाकत आहेत.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, मृत ब्युटीशियनला सुधांशू नावाच्या एका व्यक्तीने लग्नात मेहंदी लावण्यासाठी बोलावले होते. मेहंदी कार्यक्रम पारपडल्यानंतर सुधांशूने ब्युटीशियन आणि तिच्या अल्पवयीन चुलत बहिणीला रका गाडीतून पाठवले. या गाडीमध्ये सुरवातीपासूनच असलेल्या अजय, विकास आणि आदर्श या तिघांनी ब्युटीशियन आणि तिच्या बहिणींचा विनयभंग करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मृत महिलेने विरोध केला तेव्हा अजयने तिच्यावर चाकूने वार केल्याचे सांगितले जात आहे.

हे ही वाचा : 

मार्करमने दाखवला शानदार खेळ

जेईई मेन्सचा टॉपर ओमप्रकाशला लोकसभा अध्यक्षांकडून शुभेच्छा

चिकूमुळे हाडं होतात मजबूत, कमजोरीही राहते दूर

‘जिक्रा’च्या सांगण्यावरून १७ वर्षीय कुणालची चाकूने वार करून हत्या!

या घटनेत त्यांची कार दुभाजकावर आदळली आणि उलटली, ज्यामध्ये दोन्ही महिला गाडीखाली अडकल्या. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच गावकरी घटनास्थळी धावले, परंतु तिघे आरोपी आधीच पळून गेले होते. पळून जाण्यापूर्वी, हल्लेखोरांनी मृताच्या बहिणीला इशारा दिला की जर तिने घटनेची माहिती दिली तर ते तिला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला मारतील.

या घटनेनंतर, ब्युटीशियनच्या पतीने बांथरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून तिसऱ्याचा शोध सुरु आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा