28.1 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरस्पोर्ट्स"एक झंझावात कप्तान... फातिमा सना!"

“एक झंझावात कप्तान… फातिमा सना!”

Google News Follow

एक तरुणी, एक निर्भय नेत्या आणि एक चमकदार ऑलराउंडर… पाकिस्तानची फातिमा सना हिने २०२५ महिला वनडे वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेत केवळ अप्रतिम कामगिरीच बजावली नाही, तर तिला ‘टिम ऑफ द टूर्नामेंट’ची कर्णधारपदाची जबाबदारीही बहाल करण्यात आली आहे.
ICC च्या या घोषणेनंतर तिच्या नावाने क्रिकेटविश्वात जल्लोष उसळला!

पाकिस्तानच्या मुनीबा अली, नशरा संधू आणि सादिया इकबाल या तिघींनीही प्रभावी खेळ करत विशेष टीममध्ये स्थान मिळवलं.
बांगलादेश आणि यजमान भारत ह्यांनीही मुख्य वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

वेस्ट इंडिजच्या कर्णधार हेली मॅथ्यूजने शतक ठोकत आपली छाप पाडली, तर चिनेल हेनरी आणि आलियाह एलीने यांचाही खेळ लक्षवेधी ठरला.
बांगलादेशच्या निगार सुल्ताना आणि शर्मिन अख्तर, स्कॉटलंडच्या कैथरीन ब्राइस व कैथरीन फ्रेजर ह्यांचंही नाव या यशस्वी टीममध्ये समाविष्ट झालं.
राबेया खानला १२वी खेळाडू म्हणून निवडलं गेलं.

मुनीबा अलीने २२३ धावा करत स्कॉटलंड आणि बांगलादेशविरुद्ध अर्धशतकं झळकावली आणि हेली मॅथ्यूजसोबत ओपनिंग पार्टनर म्हणून निवड झाली.
हेलीने थायलंडविरुद्ध फक्त २१ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकत वनडे क्रिकेटमधील दुसऱ्या सर्वात वेगवान फिफ्टीचा विक्रम केला – २९ चेंडूंमध्ये ७० धावांची वादळी खेळी!

शर्मिन अख्तरने सलग ३ अर्धशतकं ठोकून २६६ धावा फटकावल्या,
तर स्कॉटलंडच्या कैथरीन ब्राइस हिने पाकिस्तानविरुद्ध ९१, थायलंडविरुद्ध ६० आणि आयर्लंडविरुद्ध नाबाद १३१ अशी तुफानी कामगिरी करत ‘टूर्नामेंटची सर्वोत्कृष्ट खेळाडू’ हा सन्मान पटकावला!

निगारने १०१, ५१ आणि नाबाद ८३ धावांची खेळी करत बांगलादेशच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
चिनेल हेनरी हिच्या १७ चेंडूत ४८ धावांच्या खेळीची अजूनही चर्चा आहे,
तर आलियाह एलीने १२ विकेट्स घेत भेदक कामगिरी केली.

नशरा संधूने प्रत्येक सामन्यात विकेट्स घेत वर्चस्व गाजवलं,
तर सादिया इकबालने ३.८४ च्या इकॉनॉमी रेटने ९ विकेट्स घेत प्रभावी ठसा उमटवला.
राबेया खानने आयर्लंडविरुद्ध निर्णायक सामन्यात ३ विकेट्स घेत १२वी खेळाडू म्हणून या चमकदार संघात स्थान मिळवलं.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा