27 C
Mumbai
Sunday, December 21, 2025
घरदेश दुनियापहलगाम हल्ला बंदुकधाऱ्यांनी केला, न्यूयॉर्क टाइम्सच्या हेडलाइनवरून अमेरिकेचा संताप

पहलगाम हल्ला बंदुकधाऱ्यांनी केला, न्यूयॉर्क टाइम्सच्या हेडलाइनवरून अमेरिकेचा संताप

हेडलाइनमध्ये केली सुधारणा

Google News Follow

Related

२२ एप्रिल रोजी जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथील झालेल्या आतंकी हल्ल्याची बातमी प्रसिद्ध करताना, ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकन वृत्तपत्राने वापरलेली भाषा ही अमेरिकेच्या संसदीय समितीच्या रोषाचा विषय ठरली आहे. या हल्ल्यात २६ लोकांची निर्दय हत्या झाली होती.

अमेरिकन हाऊसच्या परराष्ट्र समितीने (Foreign Affairs Committee) ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या या कव्हरेजवर कडक टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘आतंकवादी’ या स्पष्ट शब्दाऐवजी, वृत्तपत्राने ‘कट्टरतावादी’ आणि ‘बंदूकधारी’ असे सौम्य शब्द वापरले.

समितीने सोशल मीडियावर ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत NYT च्या मूळ मथळ्याचा स्क्रीनशॉट टाकला “Extremists open fire on tourists in Kashmir, killing at least 24.” या मथळ्यातील ‘Extremists’ (कट्टरतावादी) शब्दावर लाल रंगाने फटकार देत “Terrorists” (आतंकवादी) असे सुधारून लिहिले होते. त्यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला टॅग करत म्हटलं, “आम्ही तुमच्यासाठी हे दुरुस्त केलं आहे. हे स्पष्टपणे एक दहशतवादी हल्ला होता. भारत असो की इस्रायल — न्यूयॉर्क टाइम्स दहशतवादाबाबत नेहमी वास्तवापासून दूर राहतो.”

हे ही वाचा:

तुमच्या आजीने स्वातंत्र्यवीरांना पत्र पाठवले होते, हे विसरलात का?

प. बंगालच्या आसनसोलमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

मेणबत्या कसल्या पेटवता, तुमच्यातले गद्दार शोधा…

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आदिल ठोकरच्या घरावर चालवला बुलडोझर

मंगळवारी, पहलगाममधील बैसरन व्हॅली या प्रसिद्ध पर्यटनस्थळी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये किमान २६ लोक ठार झाले आणि अनेक जखमी झाले. मृतांमध्ये एक नेपाळी पर्यटक देखील होता. या पर्यटकांना तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम असे विचारून गोळ्या घालण्यात आल्या. जे हिंदू असतील त्यांना मारण्यात आले. कलमा पढता येतो का अशी विचारणा करत ही हत्या केली गेली.

‘द रेसिस्टन्स फ्रंट’ या गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा गट पाकिस्तानस्थित बंदी घालण्यात आलेल्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संलग्न आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून शोक व्यक्त केला आणि दहशतवाद्यांना योग्य शासन करण्यासाठी भारताला पूर्ण पाठिंबा दिला. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांनी देखील पंतप्रधान मोदींशी संपर्क साधून आम्ही भारतासोबत आहोत, असा संदेश दिला.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी ‘एक्स’ वर लिहिलं, “राष्ट्रपती ट्रम्प यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे आणि भारताला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. भारत आणि अमेरिका दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकत्र उभे आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा