38 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
घरक्राईमनामा...आणि केशरी रंगाच्या ट्रंकमुळे सापडले मारेकरी 

…आणि केशरी रंगाच्या ट्रंकमुळे सापडले मारेकरी 

Google News Follow

Related

मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्या खाडीत सापडला होता, अगदी त्याच खाडीपासून काही अंतरावर वाहात आलेल्या एका केशरी रंगाच्या ट्रंकेतून एका मृतदेह मुंब्र्याला लागून असलेल्या शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आला होता. ट्रंकेत असणाऱ्या मृतदेहाची ओळख पटण्यासारखा कुठलाही पुरावा नसताना केवळ ४८ तासांत त्या ट्रंकच्या रंगावरून पोलिसांनी मारेकऱ्याचा मागमूस काढत एका महिलेसह तिच्या भावाला दिवा येथून अटक केली आहे.

हे ही वाचा:

कोवॅक्सिनचे उत्पादन १० कोटी डोस प्रतिमहिना पर्यंत वाढवणार

क्लीनअप मार्शलनी लुटले कारखानदाराला

रा.स्व.संघाच्या गणवेशाने माविआ मंत्र्यांना कळा

अजून चार राफेल भारतात दाखल होणार

मुंब्रा रेतीबंदर खाडी परिसराचा काही भाग शिळ डायघर पोलिसांच्या हद्दीत येतो, दोन दिवसांपूर्वी म्हणजे रमजान ईदच्या आदल्या दिवशी या खाडीतून एका गर्द केशरी रंगाची ट्रंक वाहात खाडीच्या किनाऱ्यावर आली होती. शिळ डायघर पोलिसांनी हि ट्रंक ताब्यात घेऊन उघडली असता त्यात एका पुरुषाचा मृतदेह मिळून आला होता. मृतदेहाची ओळख पटेल अशी कुठलीही वस्तू पोलिसांना ट्रंकेत अथवा मृतदेहाजवळ मिळून आलेली नव्हती. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात चौकशी सुरु केली, तसेच ठाणे पोलीस आयुक्तालयात येणाऱ्या पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तीची माहिती मिळवली. मात्र मृतदेहाची ओळख पटत नसल्यामुळे पोलिसांनी उलटा तपास सुरू केला.  पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, रामचन्द्र मोहिते यांच्या  मार्गदर्शनाखाली सपोनि. कापडणीस, सरफरे, आरळेकर, तागड यांचे पथक तयार करण्यात आले होते.
या पथकाने पत्र्याची ट्रंक कुठे बनवली जाते याचा शोध घेतला असता या प्रकारची ट्रंक केवळ तळोजा आणि मुंबईत एका ठिकाणी बनते, अशी माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. पोलीस पथकाने पथकाने प्रथम तळोजा येथे जाऊन चौकशी केली असता ही ट्रंक आम्ही बनवली नसल्याची माहिती तळोजा येथील ट्रंक बनवणाऱ्याने दिली. मात्र अशीच ट्रंक मुंबईत तयार होते अशी माहिती तळोजा येथील ट्रंक बनवणाऱ्याने तपास पथकाला दिली. तपास पथकाने मुंबई गाठून ट्रंक बनवणारा शोधून काढला आणि त्याने ही ट्रंक मीच बनवू शकतो, असे त्याने सांगितले. गेल्या महिन्यात या ट्रंक बनवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले मात्र नेमके कुणाला विकल्या याची माहिती त्याच्याकडे नव्हती. तपास पथकाने त्यांला डोकं लाव बाबा खूप महत्वाचे आहे, आठव कुणाला दिली होती ट्रंक असे म्हटल्यावर त्याला अचानक आठवले आणि दिवा येथे एक महिला आणि एक तरुण ही ट्रंक घेऊन गेले होते, त्यावेळी त्यांनी किमतीत खूप घासाघीस केली होती, असेही त्याने सांगितले. एवढ्या माहितीवरून डायघर पोलीस पथकाने दिवा गावात शोध सुरू केला. आपले खबरी आणि तांत्रिक माहितीच्या जोरावर तपास पथकाला मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात यश आले. दिवा गाव येथे राहणारी महिला अनिता यादव आणि तिचा भाऊ विजय भलारे या दोघांना ताब्यत घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मृत इसम मनीष कुमार यादव (३०) याच्यासोबत अनिता ही लग्न न करता मागील २ वर्षांपासून राहत होती. पहिल्या पतीच्या निधनानंतर मनीष सोबत राहणाऱ्या अनिताने मनीषला लग्नासाठी विचारले होते. मनीषने लग्न करणार, असे सांगितले होते. मनीष लग्नाला नकार देत असल्याचे बघून अनिता आणि विजय या भावंडांनी मनीषला कायमचा संपवण्याची योजना महिन्याभरापूर्वीच आखली होती. त्यासाठी त्यांनी मुंबईतून ट्रंक आणून ठेवली होता. ६ मे रोजी या दोघांनी मिळून मनीषची हत्या केली आणि मृतदेह ट्रंकेत टाकून ती खाडीत फेकून दिली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा