27 C
Mumbai
Sunday, October 2, 2022
घरक्राईमनामाबजरंग दल कार्यकर्ता हर्षाचे सहा मारेकरी पकडले

बजरंग दल कार्यकर्ता हर्षाचे सहा मारेकरी पकडले

Related

कासिफ, सय्यद नदीम, मुजाहिद, रिहान, अफान, आसिफ पोलिसांच्या ताब्यात

कर्नाटकातील शिवमोग्गा येथे झालेल्या बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षा याच्या निर्घृण हत्येप्रकरणी सहाजणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून या सगळ्यांविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. कासिफ, सय्यद नदीम, मुजाहिद, रिहान, अफान, आसिफ अशी या मारेकऱ्यांची नावे आहेत.

शिवमोग्गाचे पोलीस अधीक्षक लक्ष्मी प्रसाद यांनी या अटकेविषयी पत्रकारांना माहिती दिली. पोलिसांनी असेही सांगितले की, या सहाजणांव्यतिरिक्त या हत्येसंदर्भात माहिती घेण्यासाठी आणखी १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रत्येकाला आता स्वतंत्रपणे चौकशीला सामोरे जायचे आहे. हर्षा याची हत्या करण्यामागे नेमके काय कारण होते, हे पोलिस जाणून घेणार आहेत.

हे मारेकरी कार घेऊन आले होते आणि हत्यास्थळी चहा पित उभ्या असलेल्या हर्षा या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला त्यांनी मारले. या सहाजणांपैकी सय्यद नदीम आणि कासिफ यांनी हा कट रचला. त्यांना बेंगळुरूहून अटक करण्यात आली तर इतर तीन जण हे मंगळवारी पोलिसांना सापडले.

पोलिस अधीक्षक लक्ष्मी प्रसाद म्हणाले की, ही घटना पाहणारे फार कमी साक्षीदार आहेत. पण ज्यांनी पाहिले त्यांच्या मते हर्षाचा पाठलाग या मारेकऱ्यांनी केला. या मारेकऱ्यांपैकी कासिफने हे कबूल केले की, त्याच्यासह चार जण कारमध्ये आले आणि त्यांनी हर्षावर हल्ला केला व त्याला ठार केले. धारदार शस्त्रांनी त्याला मारल्यानंतर सदर मारेकरी घटनास्थळावरून पळून गेले.

हे ही वाचा:

धक्कादायक! लाचेची रक्कम घेऊन पोलिसच पळाला

‘उत्तर प्रदेशची जनता घराणेशाहीचा पराभव करेल’

‘भारत एक सनातन यात्रा’ मधील कलाकृतींचे पाहुण्यांनी केले कौतुक!

एक डाव प्रशांतचा…. की पवारांचा ???

 

या सगळ्या परिस्थितीमुळे राज्य शासनाने शाळा, कॉलेजांना सुट्टी जाहीर केली. १४४ कलम लावण्यात आले असून जमावबंदी करण्यात आली आहे.

हर्षा हा बजरंग दलाचा कार्यकर्ता होता आणि शाळा, कॉलेजात सगळ्यांना एकच गणवेश असावा अशी मागणी त्याने केली होती. २०१५मध्ये तो चर्चेत आला होता. त्याला इस्लामी कट्टरतावाद्यांनी इश्वरनिंदेबद्दल ठार मारण्याची धमकीही दिली होती.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,946अनुयायीअनुकरण करा
41,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा