30 C
Mumbai
Monday, December 15, 2025
घरराजकारणभाजपचे राजा इक्बाल दिल्लीचे महापौर; काँग्रेस उमेदवाराला फक्त ८ मते

भाजपचे राजा इक्बाल दिल्लीचे महापौर; काँग्रेस उमेदवाराला फक्त ८ मते

आम आदमी पक्षाने निवडणुकीतून माघार घेतली होती

Google News Follow

Related

दिल्ली महानगरपालिकेवर भाजपाला आपली सत्ता आणण्यात यश आले असून काँग्रेसचा या निवडणुकीतही दारुण पराभव झाला आहे. तर, ‘आप’ने या निवडणुकीत सहभागचं घेतला नव्हता. त्यामुळे भाजपाचे सरदार राजा इक्बाल हे दिल्लीचे नवे महापौर बनले आहेत.

दिल्ली महानगरपालिकेच्या महापौर पदासाठीच्या निवडणुकीत भाजपाने सत्ता मिळवली. भाजपचे राजा इक्बाल दिल्लीचे नवे महापौर बनले आहेत. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेस उमेदवार मनदीप यांचा पराभव झाला असून त्यांना केवळ आठ मते मिळाली. तर आम आदमी पक्षाने निवडणुकीतून माघार घेतली होती. भाजपचे राजा इक्बाल यांना १३३ मते मिळाली.

भाजपने शुक्रवारी दोन वर्षांच्या अंतरानंतर दिल्ली महानगरपालिकेवर पुन्हा नियंत्रण मिळवले. आम आदमी पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने भाजपाने १४२ मतांपैकी १३३ मते मिळवून एकतर्फी विजय खेचून घेतला. सिंग यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार मनदीप यांना फक्त आठ मते मिळाली. एक मत अवैध घोषित करण्यात आले.

एमसीडीची सध्याची संख्या २३८ आहे, त्यापैकी १२ जागा रिक्त आहेत कारण काही नगरसेवक दिल्ली विधानसभेत आणि एक लोकसभेत निवडून आले आहेत. मूळ २५० जागांपैकी भाजपकडे आता ११७ नगरसेवक आहेत, जे २०२२ मध्ये १०४ होते, तर ‘आप’ची संख्या १३४ वरून ११३ झाली आहे. काँग्रेसकडे फक्त आठ जागा आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक मंडळात २३८ नगरसेवक, १० खासदार (लोकसभेचे सात आणि राज्यसभेचे तीन) आणि १४ आमदारांचा समावेश आहे. ११ भाजप आमदारांचा निवडणूक मंडळ सदस्य म्हणून समावेश केल्याने भाजपची ताकद आणखी वाढली.

हे ही वाचा:

पाकिस्तानी नागरिकांना ओळखून परत पाठवून द्या!

प. बंगालच्या आसनसोलमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

मानहानी खटला प्रकरणी मेधा पाटकर यांना अटक

दहशतवाद्यांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणणाऱ्या उपपंतप्रधानांवर पाकिस्तानी क्रिकेटपटू संतापला

मागील महापौरपदाच्या निवडणुकीत, नोव्हेंबर २०२४ मध्ये, आपचे महेश कुमार खिंची हे फक्त तीन मतांच्या अत्यंत कमी फरकाने विजयी झाले होते. या वर्षी, भाजपने घडवून आणलेल्या पक्षांतराचा हवाला देत, ‘आप’ने महापौरपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा