पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी पाकिस्तानच्या सीमेवर एक मोठा दहशतवादी कट उधळून लावला आहे. अमृतसर जिल्ह्यातील भरोपाल गावाजवळ सीमा सुरक्षा दल (BSF) आणि पंजाब पोलिसांनी संयुक्तपणे शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि ग्रेनेडचा साठा जप्त केला आहे. बीएसएफच्या गुप्तचर शाखेकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे, बुधवारी (३० एप्रिल) संध्याकाळी भरोपाल गावाभोवती संयुक्त शोध मोहीम सुरू करण्यात आली. यादरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली.
शोध मोहिमेदरम्यान, सुरक्षा दलांना २ हँडग्रेनेड, ३ पिस्तूल, ६ मॅगझिन आणि ५० जिवंत काडतुसे सापडली. जप्त केलेली शस्त्रे आणि दारूगोळा पंजाब पोलिसांना सुपूर्द करण्यात आला आहे. या संयुक्त कारवाईतून पुन्हा एकदा बीएसएफची उच्च पातळीची दक्षता आणि तयारी सिद्ध होते. ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी बीएसएफ आणि पंजाब पोलिसांमधील मजबूत समन्वयाचे प्रतिबिंब देखील दर्शवते. या यशामुळे केवळ दहशतवाद्यांचे मनसुबे उधळले गेले नाहीत तर सीमावर्ती भागात शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर बीएसएफचे जवान सक्रिय झाले आहेत आणि त्यांनी नुकेतच बांगलादेश सीमेवर तीन जणांना अटक केली. गुप्तचर माहितीच्या आधारे पश्चिम त्रिपुरातील नरसिंहगड गावात संयुक्त कारवाई दरम्यान, एका भारतीय नागरिकाला ईसीओ मारुती व्हॅनसह अटक करण्यात आली. गाडीची झडती घेतली असता, गाडीतून एस्कफ कफ सिरपच्या ८०५ बाटल्या जप्त करण्यात आल्या.
हे ही वाचा :
ही एक वेब संस्कृती, सर्जनशीलतेची
पहलगाममध्ये एनआयएचे डीजी सदानंद दाते दाखल
पहलगाम हल्ल्यानंतर तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान काय म्हणाले?
भारतासोबतच्या तणावादरम्यान पाकिस्तानच्या आयएसआय प्रमुखाला महत्त्वाची भूमिका!
दुसऱ्या एका कारवाईत, बीओपी कैयधेपा येथील बीएसएफ जवानांनी कैयधेपा बाजारपेठ परिसरातून एका भारतीय दलालाला अटक केली. अटक केलेला दलाल मानवी तस्करी आणि बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांच्या भारतात बेकायदेशीर घुसखोरीमध्ये सक्रियपणे सहभागी होता, तसेच त्यांना आश्रय आणि लॉजिस्टिकल सहाय्य पुरवत होता.
याशिवाय, सीमा सुरक्षा कुंपण ओलांडून बांगलादेशातून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका भारतीय नागरिकाला सीमा चौकी पुतियाच्या बीएसएफ जवानांनी अटक केली, त्याच्या ताब्यातून युएई आणि बांगलादेशी चलन जप्त करण्यात आले. याशिवाय, सुमारे १३ लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ आणि इतर तस्करीच्या वस्तूंचा मोठा साठा जप्त करण्यात आला.







