25 C
Mumbai
Monday, December 22, 2025
घरविशेषइम्रान खान, बिलावल भुट्टोच्या एक्स खाते भारतात ब्लॉक

इम्रान खान, बिलावल भुट्टोच्या एक्स खाते भारतात ब्लॉक

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार पाकिस्तानविरोधात अधिक कठोर भूमिका घेत आहे. याच पार्श्वभूमीवर, देशविरोधी विधाने करणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर बंदी घालण्याची मोहीम सुरु झाली आहे. या मोहिमेअंतर्गत रविवारी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इमरान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांचे ‘एक्स’ खाते भारतात ब्लॉक करण्यात आले.

भारतामधून इमरान खान आणि बिलावल भुट्टो यांचे ‘एक्स’ खाते शोधल्यास त्यांच्या प्रोफाइल पिक्चर आणि कव्हर फोटो रिकामे दिसत आहेत. तसेच एका संदेशात सांगण्यात आले आहे की, हे खाते कायदेशीर अडचणीमुळे ब्लॉक करण्यात आले आहे. यापूर्वी, पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांचे ‘एक्स’ खातेही भारतात बंद करण्यात आले होते. त्यांनी अलीकडेच दावा केला होता की इस्लामाबादकडे विश्‍वसनीय गुप्तचर माहिती आहे, जी दर्शवते की २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नवी दिल्ली २४ ते ३६ तासांत पाकिस्तानवर लष्करी कारवाई करू शकते.

हेही वाचा..

‘आम्हाला भागीदार हवे आहेत, उपदेशक नव्हे

सिख नरसंहार : राहुल गांधींची माफी म्हणजे राजकीय ढोंग

लातेहारमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला

पंजाब पोलिसांनी दोन हेरांना केली अटक

तसेच भारताने नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे अधिकृत यूट्यूब खातेही ब्लॉक केले. हे आतापर्यंत सर्वात उच्च-प्रोफाइल सोशल मीडिया खाते आहे, ज्यावर भारत सरकारने कारवाई केली आहे. ब्लॉक झालेल्या प्रोफाइलवर असे लिहिले आहे, “राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित सरकारच्या आदेशामुळे हे कंटेंट सध्या या देशात उपलब्ध नाही. याशिवाय, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचे ‘एक्स’ खाते देखील याआधीच भारतात बंद करण्यात आले आहे.

ब्लॉक करण्यात आलेल्या यूट्यूब चॅनेल्समध्ये माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर, पत्रकार आरजू काजमी, आणि कमेंटेटर सय्यद मुज्जमिल शाह यांचा समावेश आहे. ऑलिंपियन अरशद नदीम यांचे इंस्टाग्राम खाते आणि माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यांचे यूट्यूब खातेही सस्पेंड करण्यात आले आहेत. ३० एप्रिल रोजी, पाकिस्तानी अभिनेत्री हनिया आमिर आणि माहिरा खान यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइल्सलाही ब्लॉक करण्यात आले. ही सर्व कारवाई केंद्रातील मोदी सरकारकडून २२ एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर करण्यात आली आहे, ज्यामध्ये २६ निष्पाप लोकांचा बळी गेला होता. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेच्या ‘द रेसिस्टन्स फोर्स’ (टीआरएफ) या प्रतिनिधी गटाने घेतली होती. मात्र, नंतर त्यांनी आपली संलिप्तता नाकारली होती.

या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांत तणावाची परिसीमा ओलांडली गेली आहे. भारताने इस्लामाबादविरुद्ध अनेक कठोर राजनैतिक आणि धोरणात्मक पावले उचलली आहेत. यामध्ये १९६० च्या सिंधू जल कराराला तत्काळ प्रभावाने निलंबित करणे, अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट बंद करणे, आणि पाकिस्तानी नागरिकांसाठी वीजा सेवा तत्काळ बंद करणे यांचा समावेश आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा