30.6 C
Mumbai
Sunday, October 25, 2026
घरस्पोर्ट्सशेवटच्या चेंडूवर थरार, केकेआरची राजस्थानवर एक धावानं मात

शेवटच्या चेंडूवर थरार, केकेआरची राजस्थानवर एक धावानं मात

Google News Follow

क्रिकेटच्या रंगमंचावर एक अफलातून नाटक घडलं… एक चेंडू, तीन धावा, आणि संपूर्ण मैदानाचा श्वास रोखलेला! पण शेवटच्या क्षणी कोलकाता नाईट रायडर्सने आपली माती नाही खाऊ दिली… आणि राजस्थान रॉयल्सवर अवघ्या एक धावीनं थरारक विजय मिळवत प्लेऑफचं स्वप्न जिवंत ठेवलं!

कोलकात्यानं आधी फलंदाजी करत चार बाद दोनशे सहा धावांचं प्रचंड लक्ष्य उभारलं. प्रत्युत्तरात राजस्थानची टीम आठ बाद दोनशे पाच धावांवरच रोखली गेली. शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज असतानाही, त्यांना मिळालं फक्त एक रन!


पराग एकाकी नडला, पण विजय नाही!

दोनशे सात धावांच्या पाठलागासाठी आलेल्या राजस्थानचा सुरुवातीपासूनच संघर्ष सुरू झाला. चौथ्याच चेंडूवर वैभव सूर्यवंशी अवघ्या चार धावांवर बाद!
यानंतर कुणाल राठोड शून्यावर, आणि यशस्वी जैस्वाल एकवीस चेंडूत चौतीस धावा करून बाद झाला.

टीम संकटात असताना एक माणूस उभा राहिला — कप्तान रियान पराग! पंचेचाळीस चेंडूत तडाखेबाज पंच्याण्णव धावा करत त्यानं संघाला विजयाच्या उंबरठ्याजवळ नेलं.

मध्यक्रमात ध्रुव जुरेल आणि हसरंगा शून्यावर, हेटमायरनं एकोणतीस, शुभम दुबेनं नाबाद पंचवीस, आणि आर्चरनं बारा धावा करत संघर्ष केला.


केकेआरचं स्फोटक प्रदर्शन!

केकेआरकडून गुरबाजनं पंचतीस, नारायणनं अकरा, कप्तान रहाणेनं तीस, आणि अंगक्रिश रघुवंशीनं चव्वेचाळीस धावा केल्या.

पण खरी आतषबाजी केली आंद्रे रसेलनं — अवघ्या पंचवीस चेंडूत नाबाद सत्तावन्न धावा!
रिंकू सिंगनं शेवटच्या ओव्हरमध्ये केवळ सहा चेंडूत एकोणीस नाबाद धावा ठोकल्या!

गोलंदाजीत मोईन अली, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी दोन विकेट्स, तर वैभव अरोरा याला एक यश मिळालं.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा