29.8 C
Mumbai
Sunday, October 25, 2026
घरविशेषबंगालच्या उपसागरात भारत-सिंगापूरचा संयुक्त ‘सिम्बेक्स’ युद्धाभ्यास

बंगालच्या उपसागरात भारत-सिंगापूरचा संयुक्त ‘सिम्बेक्स’ युद्धाभ्यास

पहिला टप्पा विशाखापट्टणम येथे पडला पार

Google News Follow

बंगालच्या उपसागरात भारतीय आणि सिंगापूरच्या नौदलांकडून सागरी युद्धक्षमता आणि परस्पर समन्वयाचे प्रदर्शन केले जात आहे. दोन्ही देशांची युद्धनौका पाणबुड्यांचा शोध घेणे, शत्रूच्या युद्धनौकांचा मुकाबला करणे आणि हवाई हल्ल्यांच्या धोक्यांना प्रत्युत्तर देण्याचा सराव करत आहेत. द्विपक्षीय नौदल सराव ‘सिम्बेक्स-२०२६’च्या सागरी टप्प्याला सुरुवात झाली असून, २६ ऑक्टोबर हा या सरावाचा अंतिम दिवस आहे. या सरावात दोन्ही देशांची नौदले प्रत्यक्ष मोहिमेतील परिस्थितीशी मिळत्याजुळत्या वातावरणात सामरिक हालचाली करत आहेत.

या सरावाचा हा दुसरा आणि अंतिम टप्पा आहे. २४ ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा सागरी सराव २६ ऑक्टोबरपर्यंत बंगालच्या उपसागरात सुरू राहणार आहे. या टप्प्यात दोन्ही देशांची नौदले आपापल्या परिचालन क्षमतांची चाचणी घेत आहेत. यात पाणबुड्यांचा शोध घेणे आणि त्यांचा मुकाबला करणे, शत्रूच्या पृष्ठभागावरील युद्धनौकांविरोधात कारवाई करणे तसेच हवाई धोक्यांचा सामना करण्याचा सराव केला जात आहे. युद्धनौकांचे संचालन आणि विविध सामरिक कवायतींच्या माध्यमातून दोन्ही नौदले समुद्रातील परस्पर समन्वयही अधिक मजबूत करत आहेत.

हा सराव २१ ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणम येथे सुरू झाला. त्यात सहभागी होण्यासाठी सिंगापूरच्या नौदलाची युद्धनौका ‘आरएसएस सुप्रीम’ विशाखापट्टणम येथे दाखल झाली होती. उद्घाटन समारंभ भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस नीलगिरी’ आणि ‘आयएनएस कमोर्टा’ या युद्धनौकांवर आयोजित करण्यात आला होता. या वेळी पूर्व नौदल कमांडचे मुख्य कर्मचारी अधिकारी (ऑपरेशन्स), सिंगापूर नौदलाचे फ्लीट कमांडर तसेच दोन्ही देशांच्या नौदलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘सिम्बेक्स-२०२६’चा पहिला टप्पा २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान विशाखापट्टणम येथे पार पडला. या टप्प्यात बंदराशी संबंधित विविध उपक्रमांचा समावेश होता. दोन्ही देशांच्या नौदल अधिकाऱ्यांनी व्यावसायिक चर्चा, तज्ज्ञांमधील विचारविनिमय, युद्धनौकांना भेटी आणि मोहिमांच्या नियोजनासंदर्भातील बैठकांमध्ये सहभाग घेतला.

‘सिम्बेक्स-२०२६’चा उद्देश दोन्ही देशांच्या नौदलांची परिचालन क्षमता वाढवणे आणि सामायिक सागरी आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्जता मजबूत करणे हा आहे. त्याचबरोबर, हिंद-प्रशांत क्षेत्रातील शांतता, स्थैर्य आणि सागरी सुरक्षा कायम राखण्याच्या भारत आणि सिंगापूरच्या सामायिक कटिबद्धतेचेही हा सराव प्रतीक आहे.

हे ही वाचा:

अमली पदार्थ तस्करीच्या ‘डेथ ट्रायंगल’वर प्रहार

विशेष मुलांच्या आई स्वाती मोहिते यांना ‘केशवसृष्टी पुरस्कार’

मुंबईकरांनो, उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक!

जामिया विद्यापीठात विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये संघर्ष

१९९४ मध्ये झाली होती नौदल सहकार्याची सुरुवात

भारत आणि सिंगापूर यांच्यातील या नौदल सरावाची सुरुवात १९९४ मध्ये ‘एक्सरसाइज लायन किंग’ या नावाने झाली होती. कालांतराने हा सराव दोन्ही देशांमधील सागरी सहकार्याचे एक महत्त्वाचे माध्यम बनला आहे. या सरावामुळे दोन्ही देशांच्या नौदलांना एकमेकांची कार्यपद्धती समजून घेणे, अनुभवांची देवाणघेवाण करणे आणि संयुक्त मोहिमांदरम्यान अधिक चांगला समन्वय साधणे शक्य होते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा